मराठी बातम्या  /  बिझनेस  /  iPhone 14 Plus: अ‍ॅमेझॉनची ही भन्नाट ऑफर चुकवू नका; आयफोन १४ प्लस खरेदी करा अगदी स्वस्तात

iPhone 14 Plus: अ‍ॅमेझॉनची ही भन्नाट ऑफर चुकवू नका; आयफोन १४ प्लस खरेदी करा अगदी स्वस्तात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 02, 2024 05:18 PM IST

Amazon Sale: अ‍ॅमेझॉनवर आयफोन १४ प्लसच्या (१२८ जीबी) रेड व्हेरिएंट सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात प्रीमियम फीचर्स अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

Experience the brilliance of the Apple iPhone 14 Plus (128 GB) - (Product) RED with a substantial price cut on Amazon.
Experience the brilliance of the Apple iPhone 14 Plus (128 GB) - (Product) RED with a substantial price cut on Amazon. (AFP)

iPhone 14 Plus: अ‍ॅपल आयफोन १४ प्लस (१२८ जीबी) रेड व्हेरिएंट आता अ‍ॅमेझॉनवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. आयफोन अपग्रेड करू इच्छिणाऱ्यांसाठी एक भन्नाट डील आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या या सेलबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अ‍ॅमेझॉनवर आयफोन १४ प्लस व्हेरियंटच्या किंमतीत १७ टक्क्यांची मोठी कपात करण्यात आली.  आयफोन १४ प्लसची मूळ किंमत ८९ हजार ९०० रुपये इतकी आहे.  मात्र, अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या ऑफरमध्ये आयफोन ७४ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 

अ‍ॅमेझॉनवर आयफोन १४ प्लस खरेदी करताना ग्राहकांना विविध ऑफर्स आणि डिस्काउंटचा फायदा मिळू शकतो. नो कॉस्ट ईएमआयच्या पर्यायाने ग्राहक कोणतेही अतिरिक्त व्याज शुल्क न आकारता सोयीस्कर पेमेंट प्लॅनचा आनंद घेऊ शकतात. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारक ईएमआय व्याज बचतीचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे खरेदी अधिक बजेट-फ्रेंडली होईल. याव्यतिरिक्त, ग्राहक एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात. 

आयफोन १४ प्लसमध्ये अनेक प्रभावी वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळत असून फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा तसेच १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे.

 

 

 

WhatsApp channel

विभाग