Iphone Sale at Vijay Sales: विजय सेल्सचा आयफोन सेल, मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट-apple days sale on vijay sales check top discounts on iphone 15 iphone 14 and more ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Iphone Sale at Vijay Sales: विजय सेल्सचा आयफोन सेल, मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट

Iphone Sale at Vijay Sales: विजय सेल्सचा आयफोन सेल, मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट

Mar 18, 2024 09:12 PM IST

iPhone Sale: विजय सेल्सवर आयफोन १४, आयफोन १५ च्या खरेदीवर तगडं डिस्काऊंट दिले जात आहे.

Nab massive discounts on iPhones such as iPhone 15, and iPhone 14 courtesy of Vijay Sales’ Apple Days Sale.
Nab massive discounts on iPhones such as iPhone 15, and iPhone 14 courtesy of Vijay Sales’ Apple Days Sale. (Unsplash)

iPhone Sale at Vijay Sales: विजय सेल्सवर सा आयफोन १५, आयफोन १४, आयफोन १३ च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म दरवर्षी हा सेल आयोजित करतो, जिथे आयफोन, मॅकबुक्स, एअरपॉड्स, आयपॅड आणि अ‍ॅपल वॉचेस सारख्या अ‍ॅपलच्या अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट आणि इतर आकर्षक ऑफर्स आणतात. यंदा हा सेल १६ मार्चपासून सुरू झाला असून २४ मार्चपर्यंत चालणार आहे. खरेदीदारांना मोठी सूट मिळवण्यासाठी केवळ एका आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे

आयफोन १५ सीरिजच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. आयफोन १५ प्रो मॅक्सची मूळ किंमत १ लाख ५९ हजार ९०० रुपये आहे. मात्र, हा फोन अवघ्या १ लाख ४९ हजार २४९ रुपये झाली आहे. आयफोन १५ प्रोच्या किंमतीत ही ७ टक्क्यांची घसरण झाली. आता या फोनची किंमत १ लाख २५ हजार ९०० रुपये झाली आहे. दरम्यान, व्हॅनिला आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस, ज्यांची किंमत अनुक्रमे ७९ हजार ९०० आणि ८९ हजार ९०० रुपयांपासून सुरू होतात. या दोन्ही फोनची किंमत अनुक्रमे ७० हजार ४९० आणि ७९ हजार ८२० रुपये आहे.

आयफोन १४ वर देखील एक ऑफर आहे, जिथे त्याची किंमत ६९ हजार ९००  रुपयांवरून ६१ हजार १६० रुपयांपर्यंत खाली आली आहे. आयफोन १४ प्लसची किंमत आता ७० हजार ४९० रुपयांपासून सुरू होते. दरम्यान, अॅपलने विकलेला सर्वात स्वस्त फ्लॅगशिप आयफोन आयफोन १३ आणखी स्वस्त झाला आहे. याची मूळ किंमत ५९ हजार ९०० रुपयांऐवजी आता ५१ हजार ८२० रुपयांपासून सुरू होते.

विजय सेल्सवर एचडीएफसी क्रेडिट/डेबिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर डिस्काउंटसह बँक ऑफर्स मिळत आहे. ज्यामुळे ग्राहकांना आयफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Whats_app_banner
विभाग