SME IPO News : आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या छोट्या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ ३० डिसेंबरपर्यंत खुला राहणार आहे. ग्रे मार्केटमध्ये आन्या पॉलिटेकचे शेअर्स जबरदस्त तेजीत असून २१ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर व्यवहार करत आहेत.
आन्या पॉलिटेकला आयपीओच्या माध्यमातून ४४.८० कोटी रुपयांचा निधी उभा करायचा आहे. आयपीओमधील शेअरची किंमत १४ रुपये आहे. आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या आयपीओमधील शेअरची किंमत १४ रुपये आहे. सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियमचा (GMP) विचार करता आन्या पॉलिटेकचे शेअर्स १७ रुपयांवर लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स देण्यात येतील, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी २१ टक्क्यांपेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा करता येईल. आन्या पॉलिटेकचे शेअर्स गुरुवार, २ जानेवारी २०२५ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट होतील.
आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्सच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना फक्त १ लॉटसाठी गुंतवणूक करता येणार आहे. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १०००० शेअर्स आहेत. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १,४०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये हाय नेटवर्थ व्यक्तींना २ लॉटसाठी गुंतवणूक करता येणार आहे.
यशपालसिंग यादव आणि आन्या अॅग्रो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओच्या आधी प्रवर्तकांकडं कंपनीत ८९.१९ टक्के हिस्सा आहे. तो आता ६५.४० टक्क्यांवर येईल.
आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीचा व्यवसाय २०११ मध्ये सुरू झाला. ही कंपनी खते निर्मिती आणि पिशव्यांच्या निर्मितीत गुंतलेली आहे. तसेच, पर्यावरणीय सोल्युशन्सची सेवा देतात. आन्या पॉलिटेक उच्च प्रतीची एचडीपीई, पीपी बॅग आणि झिंक सल्फेट खते तयार करते.
संबंधित बातम्या