Banks Crisis : अमेरिकन बँक संकटाचे वादळ युरोपातही, स्वीस बँक क्रेडिट सुईसही अडचणीत
Banks Crisis : स्टाॅक एक्सेंज आॅपरेटर्सद्वारे क्रेडिट सुईसच्या शेअर्स ट्रेडिंगवर अनेकदा रोख लादण्यात आली. क्रेडिट सुईसचे शेअर्स बुधवारी सकाळी पहिल्यांदा दोन स्विस फ्रॅकपेक्षा खाली घसरले.
Banks Crisis : क्रेडिट सुईस एजीने गुरुवारी सांगितले की, त्यांनी स्विस नॅशनल बँकेकडून ५० अब्ज स्विस फ्रँक (५४ अब्ज डाॅलर्स) चे कर्ज घेण्याची तयारी केली आहे. लिक्विडीटी मजबूत करण्याच्या उद्देशाने ही निर्णायक कारवाई असल्याचे क्रेडिट सुईसने म्हटले आहे. बुधवारी प्रमुख स्विस बँकेच्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. त्यानंतर स्विस रेग्युलेटरीने केंद्रीय बँकेद्वारे क्रेडिट सुईसला एक 'liquidity lifeline' देण्याचे वचन दिले होते.
ट्रेंडिंग न्यूज
स्वित्झर्लडच्या क्रेडिट सुईसच्या शेअर्समध्ये बुधवारी ३० टकक्यांपर्यंत घट झाली. बुधवारी स्टाॅक एक्सेंज आॅपटर्सद्वारे क्रेडिट सुईसच्या शेअर्सचे ट्रेडिंग अनेकवेळा रोखण्यात आले. क्रेडिट सुईसचे शेअर्स बुधवारी सकाळी पहिल्यांदा २ स्विस फ्रँकपेक्षा खाली घसरले.
राॅयटर्सने १५ मार्चला सांगितले की, सिलिकाॅन व्हॅली बँक डुबल्यामुळे शेअर बाजारावर त्याचा प्रभाव दिसून आला. स्वित्झर्लँडच्या क्रेडिट सुईसमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सरकारवरचा दबाव वाढला.
क्रेडिट सुईसने २०२२ साठी आपला वार्षिक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात वित्तीय रिपोर्टिंगवर आंतरिक नियंत्रणात मटेरिअल विकनेस असल्याचे स्पष्ट म्हटले होते. गेल्या महिन्यात क्रेडिट सुईसने २००८ च्या आर्थिक मंदीनंतर सर्वाधिक नुकसान होत असल्याचे संकेत दिले होते. ग्राहकांनी अब्जावधी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत.
क्रेडिट सुईसद्वारे चिंता व्यक्त केल्यानंतर जागतिक पातळीवर विक्रीचा दबाव वाढू लागला. बँकेच्या शेअर्समध्ये झालेली घट आणि जागतिक इक्विटीतील घसरण यांमुळे जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. बँकिंग शेअर्समध्येही गेल्या काही दिवसात जबरदस्त घसरण पहायला मिळत आहे.