अनिल अंबानींच्या शेअरचा मार्केटमध्ये धमाका; १ लाखाचे केले ३३ लाख, तुमच्याकडं किती शेअर आहेत?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अनिल अंबानींच्या शेअरचा मार्केटमध्ये धमाका; १ लाखाचे केले ३३ लाख, तुमच्याकडं किती शेअर आहेत?

अनिल अंबानींच्या शेअरचा मार्केटमध्ये धमाका; १ लाखाचे केले ३३ लाख, तुमच्याकडं किती शेअर आहेत?

Published Aug 22, 2024 10:37 AM IST

Reliance Power Share price : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवरचा शेअर सध्या कमालीचा तेजीत आहे. गेल्या साडेचार वर्षांत या शेअरमध्ये ३२०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

अनिल अंबानी की कंपनी रिलायंस पावर के शेयर 52 हफ्ते की नई ऊंचाई पर पहुंच गए हैं।
अनिल अंबानी की कंपनी रिलायंस पावर के शेयर 52 हफ्ते की नई ऊंचाई पर पहुंच गए हैं।

Share market news today : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. रिलायन्स पॉवरचा शेअरला गुरुवारी ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. हा शेअर ३७.९७ रुपयांवर पोहोचला. गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

आजच्या उसळीमुळं रिलायन्स पॉवरच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. या शेअरमध्ये गेल्या साडेचार वर्षांत ३२०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १५.५३ रुपये आहे.

रिलायन्स पॉवर या कंपनीच्या शेअरनं गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर २७ मार्च २०२० रोजी १.१३ रुपयांवर होता. तो शेअर आज, २२ ऑगस्ट २०२४ रोजी ३७.९७ रुपयांवर पोहोचला आहे. 

एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ही गुंतवणूक आजही कायम ठेवली असतील तर या शेअर्सची सध्याची किंमत ३३.६० लाख रुपये झाली असती.

एका वर्षात ११५ टक्के वाढ

रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ११५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २२ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर १७.३९ रुपयांवर होता. आज तो ३७.९७ रुपयांवर पोहोचला आहे. तर, या वर्षी आतापर्यंत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अदानी पॉवर आणि रिलायन्स पॉवरमध्ये चर्चा

अदानी समूहाची अदानी पॉवर ही कंपनी रिलायन्स पॉवरसोबत एका प्रकल्पाच्या कराराबाबत बोलणी करत आहे. अदानी पॉवरनं ६०० मेगावॅटचा बुटीबोरी औष्णिक वीज प्रकल्प खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. हा प्रकल्प एकेकाळी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या मालकीचा होता. 'मिंट'च्या दोन व्यक्तींच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. हा करार २४०० ते ३००० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका व्यक्तीनं नाव न छापण्याच्या अटीवर दिली. हा करार प्रति मेगावॅट ४ ते ५ कोटी रुपये असा होण्याची शक्यता आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Whats_app_banner