मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market : एका रुपयावरून २८ रुपयांवर पोहोचला अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर, तुम्ही घेतलाय का?

stock market : एका रुपयावरून २८ रुपयांवर पोहोचला अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर, तुम्ही घेतलाय का?

Jun 11, 2024 01:23 PM IST

Reliance Power Share price : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर सध्या भलताच तेजीत असून या शेअरनं गुंतवणूकदारांना खूष करून टाकलं आहे.

एक रुपयावरून २८ रुपयांवर पोहोचला अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर, तुम्ही घेतलाय का?
एक रुपयावरून २८ रुपयांवर पोहोचला अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर, तुम्ही घेतलाय का? (PTI)

Reliance Power Share Price : गेल्या काही वर्षांपासून उद्योग वर्तुळात फारसे चर्चेत नसलेले अनिल अंबानी आता पुन्हा लाइमलाइटमध्ये येऊ लागले आहेत. रिलायन्स पॉवर ही त्यांची कंपनी त्यासाठी कारण ठरली आहे. कर्जात बुडाल्यामुळं अडचणीत सापडलेल्या रिलायन्स पॉवरनं पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. काही वर्षांपूर्वी अवघ्या १ रुपयापर्यंत घसरलेला या कंपनीचा शेअर आज २८ रुपयांवर गेला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. आज, मंगळवारी रिलायन्स पॉवरचा शेअर सुमारे ७ टक्क्यांनी वाढून २८ रुपयांवर पोहोचला. सोमवारी कंपनीचे शेअर्स २६.०७ रुपयांवर बंद झाले होते. गेल्या काही वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये २३०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या काळात वीज कंपनीचे शेअर्स १ रुपयांवरून २८ रुपयांपर्यंत वाढले आहेत. रिलायन्स पॉवरच्या समभागांची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३४.३५ रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १३.८० रुपये आहे.

१ रुपयांवरून २८ रुपयांवर पोहोचला

रिलायन्स पॉवरच्या शेअरनं गेल्या ४ वर्षांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. २७ मार्च २०२० रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स १.१३ रुपयांवर होते. आज, ११ जून २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स २८ रुपयांवर पोहोचले आहेत. रिलायन्स पॉवरच्या समभागांनी केवळ ४ वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना २३०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य आजघडीला २४.७७ लाख रुपये झाले असेल.

एका वर्षात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ

मागच्या एका वर्षात रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १२ जून २०२३ रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स १५.८५ रुपयांवर होते. ११ जून २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स २८ रुपयांवर पोहोचले आहेत. तर, मागच्या ३ महिन्यांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १३ मार्च २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स २०.३८ रुपयांवर होते, ते आज २८ वर पोहोचले आहेत. गेल्या ५ दिवसांत रिलायन्स पॉवरचे शेअर्स सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहेत.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील विश्लेषकांची मतं त्यांची स्वत:ची आहेत. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

WhatsApp channel
विभाग