stock market : अनिल अंबानी पुन्हा चर्चेत! रिलायन्स पॉवरच्या शेअरची कमाल, १ लाखाचे केले ३० लाख
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market : अनिल अंबानी पुन्हा चर्चेत! रिलायन्स पॉवरच्या शेअरची कमाल, १ लाखाचे केले ३० लाख

stock market : अनिल अंबानी पुन्हा चर्चेत! रिलायन्स पॉवरच्या शेअरची कमाल, १ लाखाचे केले ३० लाख

Updated Aug 01, 2024 11:29 AM IST

Reliance Power Share Price : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. या निमित्तानं उद्योगजगतात पुन्हा एकदा अनिल अंबानी यांची चर्चा होऊ लागली आहे.

रिलायंस पावर अब पूरी तरह कर्ज मुक्त हो गई है।
रिलायंस पावर अब पूरी तरह कर्ज मुक्त हो गई है।

Reliance Power Share Price : सुमारे १५ वर्षांपूर्वी गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळवणारा आणि अनेकांना शेअर मार्केटचा धसका घ्यायला लावणारा अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर आता पुनरागमन करत आहे. या शेअरमध्ये आज तब्बल ५ टक्क्यांची वाढ झाली असून त्यानं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. सुमारे ४ वर्षांपूर्वी यात गुंतवणूक करणाऱ्यांची अक्षरश: चांदी झाली आहे. या निमित्तानं अनिल अंबानी अनेक वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहेत.

रिलायन्स पॉवरचा शेअर ९९ टक्क्यांनी घसरून १ रुपयावर गेला होता. त्यानंतर मागच्या ४ वर्षांत या शेअरमध्ये तब्बल २९०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवर ही कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १५.५३ रुपये आहे. 

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर २३ मे २००८ रोजी २७४.८४ रुपयांवर होता. २७ मार्च २०२० रोजी कंपनीचा शेअर या पातळीवरून ९९ टक्क्यांहून अधिक घसरून १.१३ रुपयांवर आला. यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर १.१३ रुपयांवरून ३४.५० रुपयांवर पोहोचला आहे. या काळात रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये २९३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली ती गुंतवणूक कायम ठेवली असती तर या शेअर्सची किंमत सध्या ३०.५३ लाख रुपये झाली असती.

किती आणि कसा वाढला शेअर?

रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या २ वर्षात १६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ५ ऑगस्ट २०२२ रोजी कंपनीचा शेअर १३.१५ रुपयांवर होता. रिलायन्स पॉवरचा शेअर १ ऑगस्ट २०२४ रोजी ३४.५० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर १६.९८ रुपयांवर होता, तो आज, १ ऑगस्ट २०२४ रोजी ३४.४० रुपयांवर पोहोचला आहे.

कसं केलं कमबॅक?

रिलायन्स पॉवर ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. कंपनीनं आपली संपूर्ण थकबाकी भरली आहे. सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं ही माहिती दिली आहे. रिलायन्स पॉवरवर सुमारे ८०० कोटी रुपयांचं कर्ज होतं. ते सर्व फेडण्यात आलं आहे. रिलायन्स पॉवरनं डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान अनेक बँकांसोबत डेट सेटलमेंट करार केले आहेत. कंपनीनं आयडीबीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि डीबीएस सोबत डेट सेटलमेंट करार केले आहेत.

Whats_app_banner