अवघ्या ४ वर्षांत १ लाखाचे २३ लाख करणारी अनिल अंबानींची कंपनी आता EV बिझनेसमध्ये उतरणार-anil ambani owned reliance infra eyes ev foray plans to make cars and batteries ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अवघ्या ४ वर्षांत १ लाखाचे २३ लाख करणारी अनिल अंबानींची कंपनी आता EV बिझनेसमध्ये उतरणार

अवघ्या ४ वर्षांत १ लाखाचे २३ लाख करणारी अनिल अंबानींची कंपनी आता EV बिझनेसमध्ये उतरणार

Sep 07, 2024 07:51 PM IST

Reliance Infrastructure : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं इलेक्ट्रिक कार व बॅटरी निर्मितीच्या व्यवसायात उतरण्याची योजना आखली आहे. त्यावर कामही सुरू केलं आहे.

Reliance Infra : अवघ्या ४ वर्षांत १ लाखाचे २३ लाख करणारी अनिल अंबानींची कंपनी आता EV बिझनेसमध्ये उतरणार
Reliance Infra : अवघ्या ४ वर्षांत १ लाखाचे २३ लाख करणारी अनिल अंबानींची कंपनी आता EV बिझनेसमध्ये उतरणार

Stock Market Updates : गेल्या काही दिवसांपासून अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील कंपन्या शेअर बाजारात चर्चेत आहेत. रिलायन्स पॉवरनंतर आता रिलायन्स इन्फ्राची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या चार वर्षांत गुंतवणूकदारांच्या १ लाख रुपयांचे २३ लाख करून देणारी ही कंपनी आता इलेक्ट्रिक कार व बॅटरी निर्मितीच्या व्यवसायात उतरण्याची शक्यता आहे.

मागच्या दोन-चार वर्षांपासून जगातील सर्वच देश इलेक्ट्रिक वाहनांकडं वळत आहेत. साहजिकच या वाहनांची व त्याच्याशी संबंधित उत्पादनांची मागणी वाढली आहे. ऑटोमोबाईल कंपन्याही या बदलाचा फायदा घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अनेक कंपन्या नव्यानं या व्यवसायात येत आहेत. रिलायन्स इन्फ्रानंही तसा विचार सुरू केला आहे.

शेअर बाजारात कशी आहे कामगिरी?

अनेक चढउतार पाहिलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स गेल्या काही वर्षांपासून तेजीत आहे. मागच्या चार वर्षांत हे शेअर त्यांच्या नीचांकी पातळीवरून २२०० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या साडेचार वर्षांत ९ रुपयांवरून २०० रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. 

कसे झाले लाखाचे २३ लाख?

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर २७ मार्च २०२० रोजी ९.२० रुपयांवर होता. तोच शेअर ६ सप्टेंबर २०२४ रोजी २१३.१० रुपयांवर पोहोचला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये या काळात २२१७ टक्के वाढ झाली आहे. एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती तर त्याच्या आताच्या शेअर्सची किंमत २३.१५ लाख रुपये झाली असती. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ३०८ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १४३.७० रुपये आहे.

नव्या व्यवसायासाठी सल्लागाराची नियुक्ती

इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी बनवण्याच्या व्यवसायात उतरण्याच्या आपल्या योजनेवर काम करण्यासाठी कंपनीनं सल्लागार म्हणून चिनी कंपनी बीवायडीचे भारतातील माजी अधिकारी संजय गोपालकृष्णन यांची नियुक्ती केली आहे. रॉयटर्सनं ही माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांच्या कंपनीनं इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पाच्या खर्चाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी बाह्य सल्लागारांची नेमणूक केली आहे. या प्रकल्पाची वार्षिक क्षमता सुरुवातीला सुमारे २५,००,००० वाहनांची असू शकते. त्यानंतर ती ७५,००,००० वाहनांपर्यंत वाढविली जाऊ शकते.

Whats_app_banner
विभाग