मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचा विवाह नुकताच मोठ्या धामधुमीत पार पडला. या विवाहाशी संबंधित सर्व गोष्टींची चर्चा सुरू आहे. अशात लग्न लावून देणारे पंडितजी कसे सुटतील. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहासोबत विवाहाच्या आधीचे सर्व विधी पंडित चंद्रशेखर शर्मा यांनी केले. गुजरातमधील जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्येही चंद्रशेखर शर्मा उपस्थित होते. एअरपोर्टमधून बाहेर पडताना अंबानी आणि मर्चंट कुटूंबातील लोक त्यांचे स्वागत करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर जाणून घेऊन कोण आहेत पंडित चंद्रशेखर शर्मा आणि किती घेतात मानधन..
पंडित चंद्रशेखर शर्मा केवळ ज्योतिषी किंवा पुजारी नाहीत. पंडित चंद्रशेखर शर्मा हे पर्सनल कोट आणि लाइफस्टाइल मोटिव्हरही असल्याचे त्यांच्या फेसबुक वॉलवरून समजते. त्यांची अधिकृत वेबसाइट pujahoma.com नुसार ते आध्यात्मिक मार्गदर्शकही आहेत. वैवाहिक विधींसाठी पंडित शर्मा हे सामग्रीसह २५ हजार रुपये घेत असल्याची माहिती अधिकृत वेबसाईटवरुन समोर आली आहे.
पंडितजी आपल्या कामाच्या आध्यात्मिक क्षमता वाढवण्याचे ज्ञान सांगतात. ज्योतिषी शास्त्र आणि पूजा विधीसोबतच पंडितजी एक सुखी,स्वस्थ आणि समृद्ध जीवनासाठी आध्यात्मिक मार्गदर्शनही देतात.
पंडित चंद्रशेखर शर्मा यांनी आपल्यासोशल मीडियाहँडलवर अंबानींच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी असल्याचे फोटो शेअर केले आहेत. अंबानी कुटुंबानं त्यांच्या निवासस्थानी म्हणजे अँटिलियामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव आयोजित केला तेव्हाही त्यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून एक फोटो शेअर केला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद मिळवल्यानंतरचा एक फोटोही पोस्ट केला होता. यात नीता अंबानी, राधिका मर्चंट, आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि अन्य लोकही होते.
पंडितजी गेल्या चार दशकाहून अधिक काळ ज्योतिष शास्त्राशी जोडले गेले आहेत. त्यांनी देशभरातील आपल्या यजमानांना सेवा दिली आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर काही ग्राहकांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिलायंस इंडस्ट्रीज, टॅली, बीकेटी, प्रियंका चोपडा जोनास, सोनू निगम, वुडक्राफ्ट आदिंचा समावेश आहे. ज्योतिषच्या अधिकृत साईटवर पंडित शर्मा यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा फीससह उल्लेख आहे. त्यानंतर लग्नकार्यासाठी २५ हजार आहे.