Bonus Share : दुप्पट, तिप्पट नाही, ५ वर्षांत पैसे सहापट केले! आता कंपनीनं केली बोनस शेअर्सची घोषणा, शेअर सुस्साट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bonus Share : दुप्पट, तिप्पट नाही, ५ वर्षांत पैसे सहापट केले! आता कंपनीनं केली बोनस शेअर्सची घोषणा, शेअर सुस्साट

Bonus Share : दुप्पट, तिप्पट नाही, ५ वर्षांत पैसे सहापट केले! आता कंपनीनं केली बोनस शेअर्सची घोषणा, शेअर सुस्साट

Jan 09, 2025 07:44 PM IST

Anand Rathi Wealth Bonus Share : गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल सहापट करणाऱ्या आनंद राठी वेल्थ लिमिटेडनं आता बोनस शेअर्सची घोषणा केली आहे.

दुप्पट, तिप्पट नाही, ५ वर्षांत पैसे सहापट केले! आता कंपनीनं केली बोनस शेअर्सची घोषणा, शेअर सुस्साट
दुप्पट, तिप्पट नाही, ५ वर्षांत पैसे सहापट केले! आता कंपनीनं केली बोनस शेअर्सची घोषणा, शेअर सुस्साट

Anand Rathi Wealth Ltd Share Price : आनंद राठी वेल्थ लिमिटेडचा शेअर गुरुवारी ७.५ टक्क्यांपर्यंत उसळला आणि या शेअरनं ४१३३.३५ रुपये प्रति शेअरचा उच्चांक गाठला. दिवसअखेर हा शेअर २.९७ टक्क्यांनी वधारून ३९४८.३० रुपयांवर बंद झाला. कंपनीनं केलेली एक घोषणा या तेजीसाठी कारणीभूत ठरली आहे.

आनंद राठी वेल्थ लिमिटडनं आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सोमवार, १३ जानेवारी २०२५ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत बोनस शेअर्सच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे.

कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाची प्रस्तावित बैठक सोमवार, १३ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. यामध्ये संचालक मंडळ इतर गोष्टींसह बोनस शेअर्सच्या प्रस्तावावरही विचार करणार आहेत.

कंपनीचा नफा वाढला!

आनंद राठी वेल्थचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२५ च्या सप्टेंबर तिमाहीत ३२ टक्क्यांनी वाढून ७६.३ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (आर्थिक वर्ष २४) याच तिमाहीत तो ५७.७ कोटी रुपये होता. कंपनीचं उत्पन्न ३२ टक्क्यांनी वाढून २४९.६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते १८९.१ कोटी रुपये होतं. आनंद राठी यांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ५७ टक्क्यांनी वाढून ७५,०८४ कोटी रुपये झाली आहे.

पाच वर्षांत ६०० टक्के वाढला शेअर

आनंद राठी वेल्थचा शेअर मागच्या एका वर्षात ४२ टक्के आणि पाच वर्षांत ६०० टक्क्यांनी वधारला आहे. मागच्या सहा महिन्यात मात्र कंपनीनं नकारात्मक परतावा दिला आहे. या कालावधीत हा शेअर ४.१७ टक्क्यांनी घसरला आहे. आज मात्र शेअरमध्ये चांगली वाढ झाली. कंपनीचं मार्केट कॅप १६,३७९.९७ कोटी रुपये आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांक ४६४०.५५ रुपये प्रति शेअर आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २,५७५ रुपये प्रति शेअर आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner