मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Anand Mahindra Tweet : वर ओव्हरब्रीज खाली प्ले ग्राऊंड, आनंद महिंद्रांना प्रत्येक शहर असच हवं!

Anand Mahindra Tweet : वर ओव्हरब्रीज खाली प्ले ग्राऊंड, आनंद महिंद्रांना प्रत्येक शहर असच हवं!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 01, 2023 02:41 PM IST

Anand Mahindra Tweet : महिंद्रा समुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा आपल्या सोशल नेटवर्किंग व्यासपीठावर नेहमीच सक्रिय असतात. देशातील प्रत्येक शहर सुनियोजित कसं असाव यासाठी त्यांनी नुकतच केलेलं ट्विट व्हायरल होतय.

Anand Mahindra HT
Anand Mahindra HT

Anand Mahindra Tweet : देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप सक्रिय असतात. लोकांशी कनेक्ट होण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टही शेअर करत असतात. त्यांच्या मजेशीर पोस्ट्समुळे त्यांचा फॅन फॉलोइंग जास्त आहे. आता आनंद महिंद्रा यांनी पुलाखालील मोकळी जागा कशी वापरायची याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नवी मुंबईत शूट करण्यात आला आहे. पुलाखालील जागेचा चांगला उपयोग कसा करता येईल हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. पुलाखाली खेळाचे मैदान आहे जिथे लोक बास्केटबॉल, क्रिकेट असे अनेक खेळ खेळताना दिसतात.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून धनंजय_टेक नावाच्या युजरने अपलोड केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांना हा व्हिडिओ फार आवडलेला आहे. त्यामुळे तो शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी परिवर्तनशील, चला आपणही हे करुया, प्रत्येक शहरात असे ट्विट केले आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये अशी सुविधा निर्माण व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. या ट्विटला प्रतिसाद देताना काही वापरकर्त्यांनी पुलाखालील जमिनीच्या वापराचे कौतुक केले आहे. तर काहीजण चांगले उपाय सुचवत आहेत.

WhatsApp channel

विभाग