Amul Milk Price Hike : सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार; अमूल दुधाच्या दरात लिटरमागे तीन रुपयांची वाढ
Amul Milk Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा झटका देत अमूल कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली आहे. आता अमूलचे दूध खरेदी करण्यासाठी प्रतिलिटर ३ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
Amul Milk Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. अमूलने दुधाच्या दरात वाढ केली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अमूलने सर्व प्रकारच्या पॅक्ड दुधाच्या किमती प्रति लिटर ३ रुपयांनी वाढवल्या आहेत. ३ फेब्रुवारीपासून दुधाचे नवे दर लागू होणार आहेत. यापूर्वी मदर डेअरीने डिसेंबरमध्ये दुधाचे दर वाढवले होते,
ट्रेंडिंग न्यूज
कंपनीच्या निवेदनानुसार, आता अर्धा लिटर अमूल ताजे दूध २७ रुपयांना मिळेल, तर त्याच्या १ लिटर पॅकेटची किंमत ५४ रुपये असेल. अमूल गोल्डचे अर्धा किलोचे पॅकेट म्हणजेच फुल क्रीम दूध आता ३३ रुपयांना मिळेल, तर १ लिटरसाठी ६६ रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय अर्धा लिटर अमूल गाय दूध म्हणजेच अमूल गायीच्या दुधाची किंमत २८ रुपये असेल, तर १ लिटरसाठी ५६ रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, अमूल ए२ म्हशीच्या दुधाची अर्धा लिटर किंमत ३५ रुपये असेल, तर एका लिटरसाठी ७० रुपये मोजावे लागतील.
अमूल दुधाच्या दरवाढीबाबत काँग्रेसने भाजपच्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेचा संदर्भ देत त्यांची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसने ट्विट करून म्हटले आहे की, 'अमूलचे दूध ३ रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षभरात दरात आठ रुपयांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अमूल गोल्ड दूधाची किंमत ५८ रुपये प्रति लीटर होती, फेब्रुवारी २०२३ मध्ये अमूल गोल्ड दूधाची किंमत ६६ रुपये प्रति लीटर झाले. हेच काय ते अच्छे दिन ? असा सवाल विचारत आहेत.
दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दूध विक्रेत्या मदर डेअरीने दिल्ली-एनसीआर भागात विकल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली होती. मदर डेअरीने गेल्या वर्षी दुधाच्या दरात पाचव्यांदा वाढ केली आहे.'
संबंधित बातम्या
विभाग