सॅमसंग किंवा वनप्लस फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये चांगली ऑफर आहे. या बंपर ऑफरमध्ये तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस आणि वनप्लस नॉर्ड ४ हे दोन्ही स्मार्टफोन २ हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनवर तुम्हाला जबरदस्त कॅशबॅक आणि बँक डिस्काउंट देखील मिळू शकतो. याशिवाय, एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी कमी करू शकता. परंतु, एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस
या स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही २ हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनवर १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्हाला १८ हजार ८०० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
या फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा सुपर अमोलेड प्लस डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेट ऑफर करत आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेराही मिळणार आहे. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५००० एमएएचची आहे, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला वनप्लस नॉर्ड ४ ५जी
व्हेरियंट सेलमध्ये २९ हजार ९९८ रुपयांना उपलब्ध आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये तुम्ही हा फोन २ हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये फोनवर १ हजार २५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला २८ हजार २५० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
कंपनी या फोनमध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह अमोलेड डिस्प्ले देणार आहे. वनप्लसचा हा फोन स्नॅपड्रॅगन ७ प्लस जेन ३ प्रोसेसरवर काम करतो. फोनची बॅटरी ५ हजार ५०० एमएएचची असून १०० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल.