मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartphone Sale: १०० मेगापिक्सल कॅमेरा आणि १२ जीबी रॅम, किंमत फक्त १० हजार; अमेझॉनची भन्नाट ऑफर!

Smartphone Sale: १०० मेगापिक्सल कॅमेरा आणि १२ जीबी रॅम, किंमत फक्त १० हजार; अमेझॉनची भन्नाट ऑफर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 09, 2024 01:50 PM IST

Amazon Sale: अमेझॉनवर आयटेल पी ५५ आणि रिअलमी नार्झो ६० प्रो मोठी सूट मिळत आहे.

Realme Narzo 60 5g Series
Realme Narzo 60 5g Series

Amazon Top Deals of The Week: अमेझॉनवर टॉप डील्स ऑफ द वीक सेल सुरू झाले आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना जबरदस्त कॅमेरा आणि दमदार रॅम असलेले स्मार्टफोन अगदी कमी किंमत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर अमेझॉनवर रिअलमी नार्झो ६० प्रो 5G आणि आयटेल पी ५५ 5G कंपनीच्या स्मार्टफोनवर धमाकेदार सूट मिळत आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर आणि तगडे बँक डिस्काऊंट मिळत आहे.

आयटेल पी ५५ 5G

आयटेल पी ५५ 5G फोनमध्ये १२ जीबी रॅम (६ जीबी मेमरी फ्यूजन) आणि १२८ जीबी स्टोरेज मिळत आहे. अमेझॉन इंडियावर त्याची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. सेलमध्ये हा स्मार्टफोन २६ टक्के डिस्काऊंटसह हा फोन अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. बँक ऑफरद्वारे ग्राहक ८५० रुपयांची बचत करू शकतात. या फोनवर ९ हजार ४०० रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. एक्सचेंज ऑफरची किंमत जुन्या फोनच्या कंडीशनवर अवलंबून असेल.

फीचर्स

आयटेल पी ५५ 5G मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले मिळतो. दरम्यान, १२ जीबीपर्यंत रॅम असलेला हा फोन डायमेंशन ६०८० प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा एआय ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ५ हजार एमएएच क्षमता आहे, जी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रिअलमी नार्झो ६० प्रो 5G

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा फोन २३ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ८५० रुपयांची बँक ऑफर मिळते. कंपनी या फोनवर २२ हजार ६५० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

फीचर्स

या फोनमध्ये १०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळत आहे. तसेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमधील रॅम २४ पर्यंत वाढवला जाऊ शकतो.फोन डायमेंशन ७०५० प्रोसेसरवर काम करतो आणि त्याची बॅटरी ६७ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

WhatsApp channel

विभाग