अ‍ॅमेझॉन देणार १० मिनिटांत घरपोच सेवा! Blinkit आणि Zepto च्या चिंतेत वाढ, टिकून राहण्याचं आव्हान
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अ‍ॅमेझॉन देणार १० मिनिटांत घरपोच सेवा! Blinkit आणि Zepto च्या चिंतेत वाढ, टिकून राहण्याचं आव्हान

अ‍ॅमेझॉन देणार १० मिनिटांत घरपोच सेवा! Blinkit आणि Zepto च्या चिंतेत वाढ, टिकून राहण्याचं आव्हान

Nov 27, 2024 01:51 PM IST

amazon 10 minute delivery : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मपैकी मोठी कंपनी अ‍ॅमेझॉन आता १० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी देण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ब्लिंकिट आणि झेप्टोच्या अडचणी वाढणार आहे.

अ‍ॅमेझॉन देणार १० मिनिटांत घरपोच सेवा! Blinkit आणि Zepto च्या अडचणीत होणार वाढ
अ‍ॅमेझॉन देणार १० मिनिटांत घरपोच सेवा! Blinkit आणि Zepto च्या अडचणीत होणार वाढ

amazon 10 minute delivery : जागतिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आता भारतीय बाजारपेठेच्या क्विक कॉमर्स क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे.  अ‍ॅमेझॉन भारतात 'तेज' नावाची जलद ई-कॉमर्स सेवा सुरू करू करणार असून या बाबत तयारी सुरू असल्याची माहिती आहे. कंपनी  अवघ्या १० मिनिटांत ग्राहकांपर्यंत वस्तु  पोहोचवणार आहे.  या सेवेमुळे  ब्लिंकिट आणि झेप्टो, स्विगी इंस्टामार्टला तगडे आव्हान मिळणार आहे.  

सध्या ग्राहकांचा खरेदीचा ट्रेंड बदलला आहे. बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्यापेक्षा लोक ऑनलाइन खरेदीला पसंती देत आहेत. भरातात सध्या,  ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इंस्टामार्ट या प्रमुख कंपन्या आहेत. त्यांना आता अ‍ॅमेझॉनचे आव्हान मिळणार आहे. 

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडियानेही या क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे.  कंपनी आपली क्विक कॉमर्स सेवा ‘तेज’ या वर्षाच्या शेवटी  किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्याची शक्यता आहे. या साठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यापासून ते स्टोअर्स, स्टॉक-कीपिंग युनिट्स व जलद वितरण नेटवर्क तयार केले जात असल्याची माहिती आहे. 

 अ‍ॅमेझॉनने अद्याप या  सेवेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. तसेच माहितीही उघड केलेली नाही. या संदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.   अ‍ॅमेझॉन आपली नवी सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून कंपनी भारतात क्विक डिलिव्हरी सर्व्हिस आणखी वेगवान करणार असल्याचे समजते. या सेवेद्वारे केवळ १० मिनिटांत कंपनी वस्तु घरपोच डिलिव्हर करणार आहे. 

अ‍ॅमेझॉनची ही नवी सेवा नव्या नावाने सध्याच्या अ‍ॅपचा भाग बनवली जाऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे. डिसेंबर २०२४ किंवा २०२५ च्या सुरुवातीला निवडक शहरांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

 क्विक डिलिव्हरी ई-कॉमर्स क्षेत्रात अ‍ॅमेझॉनच्या प्रवेशामुळे विद्यमान अ‍ॅप्स आणि प्लॅटफॉर्मसमोर मोठं आव्हान उभ राहू शकतं. प्रामुख्याने  ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टामार्ट आणि झेप्टो सारख्या बड्या कंपन्यांना याच फटका बसणार आहे. अ‍ॅमेझॉनकडे आधीच ऑनलाइन खरेदीदारांचा मोठा युजरबेस आहे.  त्यामुळे नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणे त्यांना आव्हानात्मक ठरणार नाही. जर युजर्सला पटकन वस्तू मागवायच्या असतील तर इतर कोणत्याही अ‍ॅपऐवजी अ‍ॅमेझॉन अ‍ॅप उपयुक्त ठरेल.

सध्या भारतात झटपट ई-कॉमर्सची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे.  मोठ्या शहरांपाठोपाठ टियर-२  आणि टियर-३  मध्येही याची गरज भासू लागली आहे. विशेषत: कोविड-१९ लॉकडाऊननंतर युजर्सना घरबसल्या वस्तू मागवणे अधिक सोयीस्कर वाटत आहे. अ‍ॅमेझॉनने नव्या सेवेसाठी नोकरभरतीही सुरू केली आहे, त्यामुळे ही नवी सेवा लाँच करण्यापूर्वी कंपनीला काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे या वृतात  म्हटलं आहे.

 अलीकडेच ई कॉमर्स कंपनी प्लिफकार्टने देखील मिनिट्स ही  सेवा लाँच केली आहे. तर टाटा डिजिटलने त्यांची “निऊ फ्लॅश” सेवा देखील सुरू केली आहे. अशा परिस्थितीत आता अ‍ॅमेझॉन इंडियाही या मैदानात आता उतरणार आहे.  

 

 

Whats_app_banner