Amazon Special Deals: जर तुम्ही १५ ते २० हजार रुपयांच्या रेंजमध्ये दमदार परफॉर्मन्स आणि 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले असलेला फोन शोधत असाल तर आयक्यूओओ झेड ७ प्रो 5G तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे अॅमेझॉनच्या स्पेशल डीलमध्ये या फोनवर मोठी सूट मिळत आहे. दरम्यान, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे.
या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर देखील मिळत आहे, ज्यामुळे फोनची किंमत १० टक्क्यांनी कमी करता येऊ शकते. कंपनी या फोनवर ३० रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन १७ हजार १०० रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करू शकतो. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमचा जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
कंपनी या फोनमध्ये २४००×१०८० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.७८ इंचाचा फुल एचडी+ 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल १३०० निट्स आहे.
आयक्यूओओचा हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० चिपसेट पाहायला मिळेल.
फोनच्या रियर पॅनेलवर फोटोग्राफीसाठी ऑरा लाइटसह दोन कॅमेरे आहेत. यामध्ये ६४ मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनला पॉवर देण्यासाठी यात ४६०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ६६ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित फनटच ओएस १३ सह लॉन्च करण्यात आला होता.
कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5जी एसए/एनएसए, ड्युअल 4G व्हीओएलटीई, वाय-फाय ६ ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५.३ आणि यूएसबी टाइप-सी यांचा समावेश आहे. या ऑफर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
संबंधित बातम्या