Smartphones Under 10000: जर तुम्ही १० हजारांपेक्षा कमी किंमतीत सर्वोत्तम प्रायमरी कॅमेरा फोन शोधत असाल तर, आयटेल एस २४ हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असलेला हा फोन सध्या अॅमेझॉन इंडियावर केवळ ८ हजार ४९९ रुपयांत उपलब्ध आहे. या फोनमध्ये मेमरी फ्यूजन फीचरसह तुम्हाला १६ जीबीपर्यंत रॅम मिळेल. या फोनमध्ये कंपनी ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देखील देत आहे. या सेगमेंटनुसार फोनचा प्रोसेसरही खूप चांगला आहे.
कंपनी या फोनमध्ये १६१२×७२० पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात येणाऱ्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ आहे. हा डिस्प्ले ४८० नाइट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो.
विशेष म्हणजे डिस्प्लेमध्ये तुम्हाला डायनॅमिक बारही पाहायला मिळणार आहे. कंपनी फोनमध्ये ८ जीबी एलपीडीडीआर ४एक्स रॅम देत आहे. फोनची एकूण रॅम मेमरी फ्यूजन फ्यूजनपासून १६ जीबीपर्यंत आहे. फोनमध्ये तुम्हाला १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी९१ चिपसेट ऑफर करत आहे.
आयटेल एस २४: स्टोरेज फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह १०८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी तुम्हाला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित आयटेल ओएस १३.५ वर काम करतो. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5, जीपीएस आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक चा समावेश आहे. हा फोन डॉन ब्लॅक आणि स्टॅरी ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
आयटेल कंपनीचा आयटेल एस २५ गेल्या महिन्यात लॉन्च झा आहे. या फोनमध्ये थ्रीडी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात तुम्हाला ५० मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह २ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे पाहायला मिळतात. सेल्फीसाठी कंपनी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
संबंधित बातम्या