Massive Discount On Poco M6 Pro 5G: भारतातील टेलिकॉम कंपन्या हायस्पीड 5G चा फायदा देऊ लागल्या असून निवडक प्लानसोबत अनलिमिटेड 5G डेटाही मिळतो. मात्र, 5G इंटरनेट स्पीडचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे तुम्हाला पोकोचा 5G स्मार्टफोन पोको एम 6 प्रो 5G ९००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर पोकोचा 5G स्मार्टफोन मर्यादित काळासाठी अत्यंत स्वस्त मिळत आहे. पोको एम ६ प्रोवरील डील काही वेळातच संपणार असून यात मोठ्या फ्लॅट डिस्काऊंटव्यतिरिक्त बँक ऑफर्सचा ही फायदा दिला जात आहे. ग्राहकांची इच्छा असल्यास जुन्या फोनच्या बदल्यात एक्सचेंज डिस्काऊंटचा ही लाभ घेऊ शकतात.
पोकोच्या बजेट 5G स्मार्टफोनचे बेस व्हेरियंट ग्राहकांसाठी अॅमेझॉनवर केवळ ९ हजार ४९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. याशिवाय, सर्व बँक कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट केल्यास ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळतो. अशा प्रकारे डिव्हाइसची सुरुवातीची किंमत फक्त ८ हजार ९९९ रुपये असेल. बँक ऑफरचा पर्याय म्हणून जुना फोन रिप्लेस केल्यास ९००० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. हा स्मार्टफोन ब्लॅक किंवा ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे.
पोको डिव्हाइसमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७९ इंचाचा डिस्प्ले आहे आणि गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्टेड आहे. स्नॅपड्रॅगन ४ जेन २ प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनमध्ये बॅक पॅनेलवर ५० एमपी ड्युअल कॅमेरा आहे आणि ८ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. प्रीमियम ग्लास डिझाइनसह येणाऱ्या फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरीसह २२.५ वॅट फास्ट चार्जर मिळतो.
या वर्षातील बहुप्रतीक्षित सेल अॅमेझॉन प्राईम डे सेल येत्या २० जुलैपासून सुरू होईल आणि २१ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. या सेलमध्ये एलजी, व्होल्टास, ब्लू स्टार, सॅमसंग, रेडमी, शाओमी, आयएफबी अशा विविध ब्रँड्सवर भरघोस सूट मिळणार आहे. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, टीव्ही, एसी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही खास सेल ठरू शकते. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी अॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.
संबंधित बातम्या