मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon smartphone Holi sale: आयफोन १३ सह 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर ३८ टक्के डिस्काऊंट!

Amazon smartphone Holi sale: आयफोन १३ सह 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर ३८ टक्के डिस्काऊंट!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 18, 2024 08:49 PM IST

Smartphones Sale: अ‍ॅमेझॉनवर होळी सेल सुरु झाला असून आयफोन १३ सह या स्मार्टफोनच्या खरेदीवर ३८ टक्के डिस्काऊंट मिळत आहे.

Grab huge discount on smartphones during the Amazon Holi sale.
Grab huge discount on smartphones during the Amazon Holi sale. ( HT Tech)

Amazon Smartphone Holi Sale:  होळीचा सण जवळ आला असून ई-कॉमर्स बेवसाईट अ‍ॅमेझॉनवर आयफोन १३, पोको एम ६ प्रो, ऑनर एक्स ९ बी आणि बरेच काही यासारख्या टॉप स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट आणि ऑफर्स देण्यात आली आहे.  स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी आहे.

या स्मार्टफोनच्या खरेदीवर तगडं डिस्काऊंट 

आयफोन १३:  आयफोन ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये १२ मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे, जे विविध फोटोग्राफिक स्टाइल्स, स्मार्ट एचडीआर ४, नाइट मोड, ४के डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग आणि बरेच काही सपोर्ट करते. फ्रंटमध्ये १२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन १३ मध्ये ए १५ बायोनिक चिप देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवर आयफोन १३ च्या खरेदीवर १७ टक्के डिस्काउंटसह ४९ हजार ४९९ रुपयांमध्ये मिळू शकतो.

ऑनर एक्स ९ बी: स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ड एमोलेड डिस्प्ले असून १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १२०० निट्स पीक ब्राइटनेस आहे. ऑनर एक्स ९ बी मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६ जेन १ आणि ८ जीबी रॅम देण्यात आली. सहज गेमिंग अनुभवासाठी यात अ‍ॅड्रेनो ७१० जीपीयू देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यात ५ हजार ८०० एमएएच डीएक्सओमार्क गोल्ड ली-पो बॅटरी देण्यात आली. होळी सेलदरम्यान अ‍ॅमेझॉनवरून हा स्मार्टफोन १६ टक्के डिस्काउंटवर मिळू शकतो.

आईक्यूओ झेड 9: आयक्यूओओ झेड ९ मध्ये ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १८०० निट्स पीक ब्राइटनेस आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० प्रोसेसर देण्यात आला असून यात सेकंड जनरेशन ४ एनएम प्रोसेसर देण्यात आला आहे. आयक्यूओओ झेड 9 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ओआयएससह ५० एमपी सोनी आयएमएक्स ८८२ कॅमेरा आणि २ मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा आहे. कायमस्वरूपी परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली, जी ४४ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अ‍ॅमेझॉन होळी सेलदरम्यान या स्मार्टफोनवर २० टक्के सूट मिळत आहे.

पोको एम 6 प्रो:  या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ सह ६.७९  इंचाचा अ‍ॅडॉप्टिव्हसिंक डिस्प्ले देण्यात आला. डिस्प्ले ९० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट देतो. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४ जेन २ आणि ८ जीबी रॅम देण्यात आला आहे.  या फोनमध्ये एआय ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे,. ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पोको एम ६ प्रो मध्ये ५ हजार एमएएच बॅटरी आहे, जी २२.५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अ‍ॅमेझॉन स्मार्टफोन होळीसेलदरम्यान पोको एम ६ प्रो ३८ टक्के सूटवर उपलब्ध आहे.

WhatsApp channel

विभाग