आयफोन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेझॉनवर आयफोन १५ च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली. हा फोन ७९ हजार ९०० रुपयांसह लॉन्च करण्यात आला. मात्र, अमेझॉनवर आयफोन १५ च्या खरेदीवर ११ टक्के सूट देण्यात आली. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना ९ हजारांची सूट मिळत आहे. म्हणजेच ग्राहकांना हा स्मार्टफोन अवघ्या ७० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.
आयफोन १५ च्या खरेदीवर विविध ऑफर आणि सवलतींचा लाभ घेऊ शकतात. निवडक क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी बँक डेबिट कार्डवर अमेझॉन कडून ४ हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. केवळ ३ हजार ४४२ रुपयांपासून सुरू होणाऱ्या नो- कॉस्ट ईएमआय पर्यायांचा ही ग्राहकांना फायदा होऊ शकतो, ज्यामुळे कोणत्याही अतिरिक्त आर्थिक ओझाशिवाय आयफोन १५ खरेदी करणे सोपे होईल.
अमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना ईएमआय व्याजावर ३ हजार १९७ रुपयांपर्यंत बचत करता येईल. ज्यामुळे आयफोन १५ खरेदी केल्यास खर्चात बचत होईल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअरटेल पोस्टपेडवर स्विच करणे आणि ७ हजार रुपयांची सूट मिळविणे यासारख्या भागीदार ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी आहे.
आयफोन १५ मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळत आहे. आयफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. आयफोनमध्ये फाइंड माई वॉयस फीचर देखील सादर केले गेले. आयफोन १५ सीरीज कंपनीने आपल्या S.O.S. कॉलिंग फीचर दिली. या फोनमध्ये सॅटेलाइट फीचर देण्यात आले आहे, जे दोन वर्षांसाठी मोफत असेल.
संबंधित बातम्या