Smartphones Under 10000: १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय 5G फोन; सॅमसंग, नोकिया यादीत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartphones Under 10000: १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय 5G फोन; सॅमसंग, नोकिया यादीत

Smartphones Under 10000: १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय 5G फोन; सॅमसंग, नोकिया यादीत

Jul 02, 2024 07:53 PM IST

Amazon Sale: अ‍ॅमेझॉन 5G सुपरस्टोअरमध्ये टॉप कंपन्यांचे 5G फोन १० हजार रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करू शकता. या फोनवर दमदार बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक दिला जात आहे.

सॅमसंग आणि नोकियाच्या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे.
सॅमसंग आणि नोकियाच्या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे.

Smartphone Sale: अ‍ॅमेझॉनच्या 5G सुपरस्टोअरमध्ये बंपर डील दिली जात आहे. या डीलमध्ये तुम्ही भरघोस डिस्काउंट आणि ऑफर्ससह 5जी फोन खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुमचं बजेट खूप कमी असलं तरी या सेलमध्ये पर्यायांची कमतरता नाही. अ‍ॅमेझॉन 5जी सुपरस्टोअरमध्ये तुम्ही टॉप कंपन्यांचे 5G फोन १० हजार रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करू शकता. या फोनवर दमदार बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक दिला जात आहे. विशेष म्हणजे डीलमध्ये तुम्ही जबरदस्त एक्स्चेंज बोनससह हे फोन खरेदी करू शकता. एक्सचेंजमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. हा सेल १९ जूनपर्यंत चालणार आहे.

पोको एम ६ प्रो 5G

पोको एम ६ प्रो 5G च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही याला जवळपास ४७५ रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी करू शकता. हा फोन ४६१ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर मिळवता येऊ शकतो. कंपनी या फोनवर ९ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसदेखील देत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला फुल एचडी+ रिझोल्यूशनसह ९० हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ४ जेन २ प्रोसेसरवर काम करतो.

रेडमी १३ सी 5G
४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह सेलमध्ये १० हजार ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर १ हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे. या सवलतीसाठी तुम्हाला एसबीआय किंवा आयसीआयसीआय कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. कॅशबॅक ऑफरमध्ये तुम्हाला ५२५ रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. कंपनी या फोनवर ९ हजार ८५० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील देत आहे. तसेच याला ५०९ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. रेडमीचा हा फोन ६.७४ इंचाचा एचडी+ डिस्प्लेसह येतो. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G
या सॅमसंग फोनला सेलमध्ये १२हजार ९९९ रुपये मिळत आहेत. सेलमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजअसलेला हा फोन तुम्ही १ हजार रुपयांच्या बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या सवलतीसाठी एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. एक्स्चेंज ऑफरमध्ये सॅमसंगचा हा फोन १२ हजार ३०० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. फोनवर ६५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले पाहायला मिळेल. फोनमध्ये ६००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली.

नोकिया जी ४२ 5G
६ जीबी रॅम (६ जीबी + २ जीबी) आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह नोकिया जी ४२ 5G अ‍ॅमेझॉन 5G स्टोअरमध्ये १० हजार ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर ५२५ रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. हा हँडसेट तुम्ही ५०९ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन ९ हजार ८५० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.

Whats_app_banner