Massive Discount On Honor 200 Pro: उत्तम सेल्फी आणि रिअर कॅमेरा असलेला प्रीमियम फोन घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक दमदार डील आहे. अॅमेझॉनवर ऑनरचा लोकप्रिय फोन ऑनर २०० प्रो ५जी बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ५७ हजार ९९८ रुपये आहे. अॅमेझॉनच्या डीलमध्ये हा फोन ५ हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. एवढेच नाही तर कंपनी सर्व बँक कार्डवर ३ हजार रुपयांचा फ्लॅट इन्स्टंट डिस्काउंट देखील देत आहे.
एक्स्चेंज ऑफरमध्ये या स्मार्टफोनची किंमत २३ हजार २०० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. लक्षात ठेवा की एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि थ्रीडी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.
ऑनर कंपनीच्या या फोनमध्ये 2700x1224 पिक्सल रिझोल्यूशनसह ६.७८ इंचाचा क्वाड कर्व्ड फ्लोटिंग एमोलेड डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल ४००० निट्स आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस आपल्याला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यामध्ये ५० मेगापिक्सलचा ओआयएस कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा ओआयएस टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी दोन फ्रंट कॅमेरे मिळतील. यामध्ये ५० मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह थ्रीडी डेप्थ सेन्सरचा समावेश आहे.
हा फोन १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एस जेन ३ पाहायला मिळेल.
हा फोन ५२०० एमएएच क्षमतेची बॅटरीने सुसज्ज आहे. ही बॅटरी १०० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ६६ वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनी फोनमध्ये इन- डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देत आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा डिव्हाइस अँड्रॉइड १४ वर आधारित मॅजिकओएस ८.० वर काम करतो.