Amazon Sale: अ‍ॅमेझॉनची जबरदस्त ऑफर, भलामोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्ट टीव्हीवर ५६ टक्के सूट!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon Sale: अ‍ॅमेझॉनची जबरदस्त ऑफर, भलामोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्ट टीव्हीवर ५६ टक्के सूट!

Amazon Sale: अ‍ॅमेझॉनची जबरदस्त ऑफर, भलामोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्ट टीव्हीवर ५६ टक्के सूट!

Dec 14, 2024 10:42 PM IST

50 Inch SmartTV: अ‍ॅमेझॉनवर भलामोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्ट टीव्हीवर ५६ टक्के सूट मिळत आहे.

भलामोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्टटीव्हीवर ५६ टक्के सूट!
भलामोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्टटीव्हीवर ५६ टक्के सूट!

50 Inch SmartTV Under 30000: भलामोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर भरघोस सूट मिळत आहे. ग्राहकांना ३० हजारांच्या बजेटमध्ये शाओमी, सॅमसंग, एलजी, तोशिबा, ओनिडा कंपनीच्या टीव्ही खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सर्व स्मार्ट टीव्ही खास फीचर्ससह येतात.

एसर १२६ सेमी (५० इंच)  स्मार्टटीव्ही

अ‍ॅमेझॉनवर एसर १२६ सेमी (५० इंच) आय प्रो सीरिज 4के अल्ट्रा एचडी एलईडी स्मार्ट गुगल टीव्ही या टीव्हीची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर जोरदार डिस्काउंट. हा टीव्ही ५६ टक्के डिस्काउंटसह येत आहे. यात ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ ५.२ देण्यात आले आहेत. उत्तम साउंड इफेक्ट्ससाठी यात डॉल्बी अ‍ॅटमॉससह स्पीकर्स देण्यात आले आहेत. यात स्टँडर्ड, स्पीच, म्युझिक, स्टेडियम आणि युजर असे विविध प्रकारचे साउंड मोड आहेत. हा टीव्ही २ जीबी रॅमसह १६ जीबी स्टोरेजसोबत येतो. यात रिमोट विथ व्हॉईस फीचर आणि गुगल असिस्टंट देखील आहे. यात एक वर्षाची वॉरंटी मिळते.

टीसीएल ५० इंच स्मार्टटीव्ही

टीसीएल ५० इंच मेटॅलिक बेजल-लेस सीरिज 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी गुगल टीव्हीवर ५६ टक्के सूट मिळत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३ एचडीएमआय पोर्ट आहेत. उत्तम आवाजासाठी यात डॉल्बी ऑडिओ एमएस १२ वाय आहे. या टीव्हीमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी रॉम असून ६४ बिट क्वाडकोर् प्रोसेसर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये आय केअर फीचरचाही समावेश आहे. गुगल असिस्टंट देखील उपलब्ध आहे. हा टीव्ही २ वर्षांच्या वॉरंटीसह येत आहे.

 

ओनिडा १२५ सेमी (५० इंच) स्मार्टटीव्ही

ओनिडा १२५ सेमी (५० इंच) नेक्सजी सीरिज 4K अल्ट्रा एचडी एलईडी स्मार्ट गुगल टीव्ही आपल्याला ३२ टक्केची मोठी सूट मिळू शकते. यासाठी तुम्हाला अॅमेझॉनवर जाऊन लवकरात लवकर ऑर्डर करावी लागेल. ओनिडा ५० इंचाचा अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही एक आश्चर्यकारक डिस्प्ले आणि बिल्ट-इन गुगल असिस्टंटसह शक्तिशाली साउंड सिस्टमसह येतो. म्हणजेच तुम्ही फक्त आवाजाने टीव्ही कंट्रोल करू शकता.

तोशिबा १२६ सेमी (५० इंच)

टोशिबा १२६ सेमी (५० इंच) सी ३५० एनपी सीरिज 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी गुगल टीव्हीची स्टायलिश डिझाइन आणि आकर्षक लूक तुम्हाला वेड लावेल. टोशिबा ५० इंचाचा अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही स्लीक डिझाइन आणि आश्चर्यकारक डिस्प्लेसह येतो.

वू १२६ सेमी (५० इंच) व्हाईब सीरिज क्यूएलईडी गुगल टीव्ही

वू १२६ सेमी (५० इंच) वाइब सीरिज क्यूएलईडी गुगल टीव्ही आपल्याला त्याच्या उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी आणि उत्कृष्ट साउंड सिस्टमची अनुभूती देते. याच्या अल्ट्रा एचडी डिस्प्ले आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह, आपण मनोरंजनाला एका नवीन पातळीवर नेऊ शकाल. याचे स्लीक डिझाइन आणि अनेक कनेक्टिव्हिटी पर्याय यामुळे ते अधिक आकर्षक बनते. अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर केल्यास तुम्हाला ३७ टक्के डिस्काउंटही दिला जाणार आहे.

Whats_app_banner