Amazon Sale on LG Smart TV: नवीन वर्षाच्या आधी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर विश्वासू ब्रँड एलजीचे ४३ इंच स्क्रीन साइज मॉडेल खास सवलतीत खरेदी करता येईल. एलजी हा काही ब्रँडपैकी एक आहे, जो डिस्प्ले बनविण्याच्या बाबतीत टॉप टेक ब्रँडपैकी एक आहे. एलजीकडून आपल्या मोठ्या डिस्प्ले टीव्हीमध्ये वेबओएस मिळत आहे आणि कंपनी स्मार्ट टीव्हीमध्ये पाच वर्षांपर्यंत अपडेट सॉफ्टवेअर मिळत होते.
विशेष म्हणजे, ४३ इंच स्क्रीन साईज असलेल्या एलजी स्मार्ट टीव्हीवर मोठा फ्लॅट डिस्काउंट दिला जात असून कूपन डिस्काउंटही मिळत आहे. हा स्मार्ट टीव्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून खास डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहे. हा स्मार्ट टीव्ही प्रीमियम बिल्ड-क्वालिटी ऑफर करतो आणि बेजल-लेस डिझाइन ऑफर करत आहे. यात एआय ब्राइटनेस आणि एआय साउंडसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
४३ इंच स्क्रीन साइज मॉडेलची मूळ किंमत ५० हजार रुपयांच्या जवळपास दाखवण्यात आली आहे. परंतु, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर मर्यादित वेळेच्या डीलमुळे याला २९ हजार ९९० रुपयांना लिस्ट करण्यात आले. तसेच या स्मार्ट टीव्हीवर १००० रुपयांचा कूपन डिस्काउंट देखील देण्यात आला आहे. कॅनरा बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यास ग्राहकांना १००० रुपयांची सूट मिळत आहे. ऑफर्समुळे एलजी स्मार्ट टीव्हीची प्रभावी किंमत केवळ २७ हजार ९९० रुपये आहे. या ऑफर्सबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
एलजी स्मार्ट टीव्हीमध्ये ४३ इंचाचा स्क्रीन साइज 4K डिस्प्ले असून बिल्ट-इन वायफाय व्यतिरिक्त यात दोन यूएसबी पोर्टव्यतिरिक्त कनेक्टिव्हिटीचे इतर पर्यायही आहेत. दमदार साउंड आउटपुटसाठी यात २० वॅट क्षमतेचे २.० चॅनेल स्पीकर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, एआय साऊंडचा सपोर्ट दिला जात आहे. बाकी स्मार्ट टीव्ही फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात वेबओएस स्मार्ट टीव्ही सॉफ्टवेअर स्किन आणि एआय थिनक्यू सपोर्ट देण्यात आला आहे.
अॅमेझॉनवर सुरू असलेल्या ख्रिसमस सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात उपलब्ध आहेत. मात्र, ही ऑफर मर्यादीत काळापुरती आहे. त्यामुळे नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार असलेल्या ग्राहकांसाठी चांगली संधी आहे.
संबंधित बातम्या