OnePlus Best Offer: वनप्लसचा ३८ हजारांचा फोन अवघ्या ११ हजारांत होणार तुमचा!-amazon refurbished smartphone sale oneplus 6 t price cut ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OnePlus Best Offer: वनप्लसचा ३८ हजारांचा फोन अवघ्या ११ हजारांत होणार तुमचा!

OnePlus Best Offer: वनप्लसचा ३८ हजारांचा फोन अवघ्या ११ हजारांत होणार तुमचा!

Jan 20, 2024 11:26 PM IST

OnePlus Smartphone:अमेझॉनवर वनप्लसच्या स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे.

OnePlus 6 T
OnePlus 6 T

OnePlus Refurbished Smartphones: वनप्लस कंपनीचे असे काही स्मार्टफोन आहेत, त्यांची बाजारात क्रेझ आहे. परंतु, या स्मार्टफोनची किंमत जास्त असल्याने अनेक ग्राहक त्याकडे पाठ फिरवतात. मात्र, अशा ग्राहकांसाठी वनप्लसने भन्नाट डील आणली आहे, ज्याद्वारे ग्राहकांना वनप्लस कंपनीचा वनप्लस ६ टी स्मार्टफोन अवघ्या ११ हजारात खरेदी करता येऊ शकतो, जो ३७ हजार ९९९ रुपयांसह बाजारात लॉन्च झाला होता.

हा स्मार्टफोन २०१८ मध्ये भारतीय बाजारात दाखल झाला होता. या स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ३७ हजार ९९९ रुपये होती. परंतु, अमेझॉनवर या स्मार्टफोनच्या रीफर्बिश्ड मॉडेल अवघ्या ११ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. यामुळे ग्राहकांना २६ हजारांची बचत करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर्स मिळत आहेत.

वनप्लस ६ टी हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेजसह भारतात लान्च झाला होता. ६ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज असेलल्या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये होती. तर, ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेजस असलेल्या व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे ४१ हजार ९९९ रुपये आणि ४५ हजार ९९९ रुपये इतकी होती.

या स्मार्टफोमध्ये ग्राहकांना ६.४२ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. या फोनमध्ये ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २० मेगापिक्सलचा अल्ट्रा अँगल मिळत आहे. सेल्फीसाठी ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. तसेच ३ हजार ७०० एमएएचची बॅटरी मिळत आहे.

Whats_app_banner
विभाग