Prepaid Plans: लोकप्रिय ओटीटी सेवा अॅमेझॉन प्राइमची सदस्यता घेण्यासाठी वेगळे पैसे देत असाल तर अत्ताच थांबावा, कारण रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आपल्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना अॅमेझॉन प्राइमची मोफत सदस्यता देत आहेत. या प्लानबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओ युजर्सला १ हजार २९ रुपयांच्या प्लानने रिचार्ज केल्यास ८४ दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शन फ्री दिले जात आहे. याशिवाय, याच वैधतेसाठी दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससारखे फायदे देखील मिळतात. तसेच जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. पात्र, ग्राहक अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकतात.
एअरटेल ८३८ रुपये आणि १ हजार १९९ रुपयांचे प्लान ऑफर करत आहे, ज्यामध्ये अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप दिली जात आहे. पहिल्या प्लानची वैधता ५६ दिवसांची असून दररोज ३ जीबी डेटा मिळतो. दुसऱ्या प्लानमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. दोन्ही रिचार्जवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगव्यतिरिक्त दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय आहे. ग्राहकांना दोन्ही प्लॅनसोबत एअरटेल थँक्स बेनिफिट्स दिले जात आहेत. याशिवाय पात्र युजर्संना अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळत आहे.
व्होडाफोन आयडिया ग्राहकांना ९९६ रुपये आणि ३ हजार ७९९ रुपयांच्या प्लानसह विनामूल्य अॅमेझॉन प्राइमलाइट सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या प्लानची वैधता अनुक्रमे ८४ दिवस आणि ३६५ दिवसांची आहे. दररोज २ जीबी डेटाव्यतिरिक्त दोघांनाही अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय मिळत आहे. या प्लानमध्ये मध्यरात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. दोन्ही प्लानमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलीट सारखे फायदे दिले जात आहेत. पहिल्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शन तर ३५६ दिवसांसाठी दुसरा प्लान दिला जात आहे.
संबंधित बातम्या