AI Smart TV : तुमचं घर बनेल थिएटर! अवघ्या ११ हजारांत मिळणार एआय फीचर्स असलेला स्मार्ट टीव्ही
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  AI Smart TV : तुमचं घर बनेल थिएटर! अवघ्या ११ हजारांत मिळणार एआय फीचर्स असलेला स्मार्ट टीव्ही

AI Smart TV : तुमचं घर बनेल थिएटर! अवघ्या ११ हजारांत मिळणार एआय फीचर्स असलेला स्मार्ट टीव्ही

Jul 17, 2024 04:49 PM IST

Smart TV Sale: ई- कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर प्राइम डे सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीच्या खेरदीवर भरघोश सूट मिळत आहे.

अवघ्या ११ हजारांत मिळणार एआय फीचर्स असलेली स्मार्ट टीव्ही
अवघ्या ११ हजारांत मिळणार एआय फीचर्स असलेली स्मार्ट टीव्ही

Amazon Prime Day Sale:  नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅमेझॉनचा प्राइम डे सेल आणि  मध्ये अनेक इलेक्ट्रिक वस्तूवर भरघोस सूट दिली जात आहे. हा सेल २० जुलै २०२४ पासून सुरु होणार असून फक्त दोन दिवसांसाठी मर्यादीत असेल. या सेलमध्ये कोडक कंपनीचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. १९ जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्टच्या गॉट सेलदरम्यान कोडॅकचा ४३ इंचाचा क्यूएलईडी स्मार्ट टीव्ही उपलब्ध होणार आहे. या टीव्हीमध्ये डॉल्बी डिजिटल प्लस, गुगल असिस्टंट आणि ४८ वॉटचे स्पीकर आउटपुट असे फीचर्स देण्यात आले आहेत.

कोडकच्या ३२ इंचाच्या क्यूएलईडी स्मार्ट टीव्हीची किंमत अ‍ॅमेझॉनवर ११ हजार ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. तर फ्लिपकार्टवर मिळणाऱ्या कोडॅकच्या ४३ इंचाच्या क्यूएलईडी टीव्हीची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे.

कोडकचा ३२ इंचाचा क्यूएलईडी टीव्ही पाहण्याचा उत्तम अनुभव देतो. स्मार्ट टीव्ही गुगल अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टिमसह येतात. कोडकच्या नव्या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, यूट्यूब, डिस्ने+हॉटस्टार आणि प्राइम स्ट्रिमिंगची बटणे मिळणार आहेत. टीव्हीमध्ये तीन एचडीएमआय पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे.

टीव्हीमध्ये डॉल्बी डिजिटल प्लस साउंड टेक्नॉलॉजी असून ड्युअल बॉक्स स्पीकर्समधून ४८ वॉट आरएमएस आउटपुट देण्यात आले आहे. क्यूएलईडी 4K डिस्प्ले १.१ अब्ज रंगांसह येतो टीव्ही डॉल्बी एटमॉस, डॉल्बी व्हिजन सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये डीटीएस ट्रूसराउंड, क्यूएलईडी 4K डिस्प्ले, डॉल्बी एमएस १२, एचडीआर १०+, २ जीबी रॅम आणि बरेच काही आहे. या टीव्हीमध्ये १६ जीबी इंटरनल स्टोरेज आणि बेजललेस डिझाइन देण्यात आले आहे. 

ई-कॉमर्स कंपनीने पुन्हा एकदा उपकरणांपासून गॅझेट्सपर्यंत आणि फॅशन, ब्युटी आणि सेलदरम्यान काय नाही अशा श्रेणींमध्ये आकर्षक डील्स आणि ऑफर्स आणल्या आहेत. अ‍ॅमेझॉन आपल्या गरजा आणि अपेक्षांनुसार विविध प्रकारची उपकरणे होस्ट करते. तसेच एलजी, व्होल्टास, ब्लू स्टार, सॅमसंग, रेडमी, शाओमी, आयएफबी अशा विविध ब्रँड्सची ही यादी आहे. म्हणून, आम्ही ही यादी या उपकरणांच्या ऑफर आणि सवलतींसह तयार केली आहे, जेणेकरून आपल्याला योग्य ब्रँड आणि सर्वोत्तम सौदे निवडण्यात मदत होईल.

Whats_app_banner