डिलिव्हरीची विश्वासार्हता, वेग आणि उत्तम परताव्याचा अनुभव यामुळे ग्राहक ॲमेझॉन आणि ॲमेझॉन प्राइम डेवर विश्वास ठेवतात, असे ॲमेझॉन प्राईम, डिलिव्हरी अँड रिटर्न्स एक्सपीरियंसचे संचालक आणि प्रमुख अक्षय साही यांनी सांगितले. ॲमेझॉनच्या प्राइम डेच्या आठवा सेल २० जुलैच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार असून हा सेल २४ तासांसाठी असणार आहे.
भारतात डील्स, प्रॉडक्ट लाँचिंगआणि एंटरटेन्मेंट हे प्राईम डेचे तीन आधारस्तंभ आहेत. देशाने प्राइम डेकडे प्रत्येक गोष्टीचा खरा उत्सव म्हणून पाहिले, केवळ एक डील इव्हेंट म्हणून नाही, असे ते म्हणाले. ॲमेझॉनचे जगभरात २० कोटींहून अधिक प्राईम मेंबर्स असून, यात भारताचा वाटा मोठा आहे. २०२३ च्या प्राइम डेमध्ये एका मिनिटात जवळपास २३,००० ऑर्डर देण्यात आल्या होत्या.
यंदाच्या प्राइम डेमध्ये होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू अशा श्रेणींमध्ये ४५० हून अधिक ब्रँडची नवीन उत्पादने असतील.
ॲमेझॉनने टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे, भारताच्या १०० % पिनकोडची सेवा देण्याचा दावा केला आहे, ९७% पिनकोडमध्ये दोन दिवसांच्या आत डिलिव्हरीसाठी किंवा त्यापेक्षा वेगवान वस्तू उपलब्ध आहेत.
प्राइम डे २०२४ रोजी अपेक्षित मोठ्या प्रमाणात ऑर्डर पूर्ण करण्यासाठी, ॲमेझॉनने आपल्या लॉजिस्टिक नेटवर्कचा विस्तार केला आहे. १५ राज्यांमध्ये पुरवठा केंद्रे, १९ राज्यांमध्ये सॉर्टेशन सेंटर्स, २८,००० डिलिव्हरी भागीदार, १९५० लास्ट-माईल स्टेशन्स आहेत.
प्राइम डे २०२४ मध्ये आयफोन १३, रियलमी नार्झो ७० एक्स आणि वनप्लस १२ आर सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर सूट मिळू शकते. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, प्राइम व्हिडिओ मिर्झापूर सीझन 3 (हिंदी) आणि नुकताच प्रदर्शित झालेला द बॉईज सीझन 4 (इंग्रजी) अशा पाच भाषांमध्ये १४ ओरिजिनल मालिका आणि चित्रपटांची घोषणा करेल.
आयटेल भारतीय बाजारपेठेत आयटेल कलर प्रो 5G नावाचा नवा 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी लाँचिंगपूर्वी आयटेल इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर त्याचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स लिस्ट करण्यात आले आहेत.