iPhone 15 Pro Max Price Drop: आयफोन १५ प्रो मॅक्स खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. अॅमेझॉनवर आयफोन १५ प्रो मॅक्स मूळ किंमतीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध झाला आहे. याशिवाय, निवडक बँक क्रेडिट कार्डवर ग्राहकांना अतिरिक्त सूट देखील मिळत आहे.
आयफोन १५ प्रो मॅक्स हा १ लाख ५९ हजार ९०० रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. २५६ जीबी स्टोरेज असलेल्या फोनच्या बेस व्हेरियंटची ही किंमत आहे. आयफोन १६ लॉन्च झाल्यानंतर अॅपलने आयफोन १५ प्रो मॅक्स बंद केला असला तरी तो अजूनही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
अॅमेझॉन इंडियावर आयफोन १५ प्रो मॅक्स (व्हाईट टायटॅनियम कलर) १ लाख १५ हजार ९०० रुपयांना लिस्टेड करण्यात आला आहे, जो आयफोन १६ प्रो मॅक्सपेक्षा सुमारे ३० हजारांनी स्वस्त आहे. याशिवाय, अॅमेझॉन पे, आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ५००० हजारांची अतिरिक्त सूट मिळत आहे. आयफोन १५ प्रो मॅक्स आणि आयफोन १६ प्रो मॅक्स यांच्यातील फीचर्समध्ये फारसा बदल नाही. त्यामुळे ग्राहक आयफोन १६ प्रो मॅक्स खरेदी करण्याऐवजी आयफोन १५ प्रो मॅक्स हा पर्याय निवडू शकतात.
आयफोन १५ प्रो मॅक्स हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे, जो जीएसएम, सीडीएमए, एचएसपीए, ईव्हीडीओ, एलटीई आणि 5G सह प्रगत नेटवर्क टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. यात टायटॅनियम फ्रेमसह ग्लास फ्रंट आणि बॅकसह एक मजबूत डिझाइन आहे. हा आयपी ६८ रेटिंग असलेला वॉटरप्रूफ फोन आहे. हा फोन ६ मीटर खोल पाण्यात ३० मिनिटे वापरता येऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. आयफोन १५ प्रो मॅक्समध्ये ६.७ इंचाचा एलटीपीओ सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले असून १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १०, डॉल्बी व्हिजन आणि २००० पर्यंत निट्स सपोर्ट आहे.
आयफोन १५ प्रो मॅक्समध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी ते १ टीबीपर्यंत स्टोरेज पर्यायसह उपलब्ध आहेत. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ४८ मेगापिक्सलचा वाइड लेन्स, ५ एक्स ऑप्टिकल झूमसह १२ मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा ऑटोफोकस आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह १२ मेगापिक्सलचा वाइड सेन्सर आहे, जो उच्च-गुणवत्तेच्या सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी परफेक्ट आहे. हे आयफोन मॉडेल वाय-फाय ६ ई, ब्लूटूथ ५.३ आणि अल्ट्रा वाइडबँड टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.