मराठी बातम्या  /  Business  /  Amazon Not Accept 2000 Rupees Notes From Today Big Announcement From Giant E Commerce

Amazon 2000 note ban : आजपासून २००० च्या नोटा अॅमेझाॅनने केल्या बंद, कंपनीची महत्त्वपूर्ण घोषणा

amazon HT
amazon HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Sep 19, 2023 02:37 PM IST

Amazon 2000 note ban : ई काॅमर्स कंपनी अॅमेझाॅनवरून तुम्ही कॅश आँन डिलिव्हरी प्राॅडक्ट मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कंपनीने ग्राहकांकडून २००० रुपयांच्या नोटा स्विकारणे आता कायमस्वरूपी बंद केले आहे.

Amazon 2000 note ban : ई काँमर्स कंपनी अॅमेझाॅनवरून प्राॅडक्ट कॅश आँन डिलिव्हरीवर तुम्ही मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यापुढे आता तुम्ही सीओडीवर प्राॅडक्ट आँर्डर करत असाल तर डिलीव्हरी बाॅय २००० ची नोट स्विकारणार नाही. दरम्यान अॅमेझाॅनशी निगडित थर्ड पार्टी कुरियर सेवा अद्याप २००० च्या नोटा स्विकारत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलण्याची संधी

१९ मे २०२३ ला रिझर्व्ह बँकेने एक आदेश जारी केला होता. त्या आदेशाअंतर्गत २००० च्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या. ज्या ग्राहकांकडे २००० च्या नोटा आहेत त्यांना त्या बदलण्याची संधी देण्यात आली आहे.

सीओडीच्या मागणीत वाढ

आरबीआयच्या आदेशानंतर ई काॅमर्स कंपन्यांमध्ये कॅश आँन डिलिव्हरीच्या मागणीत वाढ झाली होती. त्यांतर्गतत ग्राहक उत्पादन खरेदी करून मुद्दाम सीओडीचा पर्याय स्विकारत होते. जेणेकरून २००० च्या नोटा बदली करता येतील. आणि नोटा बदलण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही. मात्र आता अॅमेझाॅनने २००० च्या चलनी नोटा स्विकारणे बंद केले आहे.

२००० च्या किती नोटा परत आल्या.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की ३० जून पर्यंत बँकांमध्ये २.७२ ट्रिलियन नोटा मिळाल्या आहेत.. याआधी २००० च्या अंदाजे ५० टक्क्यांहून अधिक नोटा २० दिवसांच्या आतच परत आल्याचे आरबीआयने जाहीर केले होते.

विभाग