Realme Narzo 70 Pro 5G: अॅमेझॉनवर सध्या मॉन्सून सेल सुरू आहे. या सेलअंतर्गत अनेक स्मार्टफोन सस्तात खेरदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा सेल २५ जूनपर्यंत चालणार आहे. रिअलमीचा कंपनीचा नुकताच लॉन्च झालेला रिअलमी ७० प्रो 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे.
रिअलमी ७० प्रो 5G मार्च २०२४ मध्ये भारतात लॉन्च झाला होता. अॅमेझॉन मॉन्सून सेलमध्ये हा फोन ५ हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. पहिल्याच सेलमध्ये तुफान विक्री झालेला हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकतात. याशिवाय, फोनवर एक्स्चेंज बोनससह अनेक बॅक ऑफर्स देखील आहेत.
अॅमेझॉनवर रिअलमी ७० प्रोच्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट १९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यावर ४,००० रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे. डिस्काउंटनंतर १२८ जीबी व्हेरिएंटची प्रभावी किंमत १५ हजार ९९९ रुपये असेल. त्याचप्रमाणे ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंट २१ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या मॉडेलवर ५,००० रुपयांचा कूपन डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटनंतर २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये असेल.
डीबीएस बँक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय आणि डेबिट कार्ड नॉन-ईएमआय ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला १ हजार ५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतो. हा फोन तुम्हाला ईएमआयवरही मिळू शकतो. तर, १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटवर १८ हजार ५०० रुपयांपर्यंत आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटवर २० हजार ३०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील मिळत आहे. एक्सचेंजमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. हा सेल १९ जूनपर्यंत चालणार आहे.
या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळत आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २००० नाइट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात माली- जी ६८ जीपीयू आणि ६ एनएम मीडियाटेक डायमेंसिटी ७०५० प्रोसेसर आहे आणि अँड्रॉइड १४ वर आधारित रियलमी यूआय ५.० वर चालतो. फोनमध्ये ६७ वॉट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी आहे. दमदार आवाजासाठी हा फोन ड्युअल स्पीकर सेटअपसोबत येतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून ओआयएससोबत ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला आयपी ५४ रेटिंग देण्यात आले असून कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.२ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहे. फोनमध्ये एअर जेस्चर आणि रेन वॉटर स्मार्ट टच सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या