मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon मध्ये पुन्हा एकदा नोकर कपात! तब्बल ४०० कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात

Amazon मध्ये पुन्हा एकदा नोकर कपात! तब्बल ४०० कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 07, 2024 12:12 PM IST

Amazon news : तंत्रज्ञान उद्योगात नोकर कपात सुरूच आहे. अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या आरोग्य सेवा विभागातील सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

 The Amazon
The Amazon (AP)

amazon layoff jobs of 400 employees : तंत्रज्ञान उद्योगात नोकर कपातीची प्रक्रिया सुरूच आहे. आता अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी Amazonने आपल्या आरोग्य सेवा विभागातील सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ॲमेझॉन हेल्थकेअर सर्व्हिसेसचे अधिकारी नील लिंडसे यांनी कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे या बाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले की Amazon ने एक नवीन तंत्रज्ञान आणले असून यामुले त्यांच्या हेल्थकेअर युनिटमध्ये काहीशे नोकऱ्या कमी होतील. मात्र, किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही.

Mumbai CSMT Station : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील टॉयलेट, बाथरूममधून १२ लाखांचे नळ, तोट्या लंपास

किती कर्मचारी कामावरून काढले ?

बिझनेस इनसाइडरच्या मते, ॲमेझॉनच्या वन मेडिकल आणि ॲमेझॉन फार्मसीमध्ये सुमारे ११५ पदे कमी केली जाऊ शकतात. याशिवाय या क्षेत्रात आणखी नोकर कपात होण्याची शक्यता आहे. एकूण ४०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, ॲमेझॉनच्या वारिष्ठांची इच्छा आहे की वन मेडिकलने त्याचे कामाचे प्रमाण कमी करावे, आरोग्य सेवा कंपनीला या वर्षी अतिरिक्त १०० दशलक्ष डॉलर्सची बचत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वन मेडिकलचे उद्दिष्ट २०२८ पर्यंत एकूण महसुलाच्या ४२ टक्यांवरून २० टक्क्यांपर्यंत त्याचा भांडवली खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की Amazon ने जुलै २०२२ मध्ये वन मेडिकल कंपनी ही ३.९ बिलियन डॉलर्सला विकत घेतली होती.

Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक, पोलिसांनी तपासल्या १९ हजार ऑडिओ क्लिप

एकाधिक विभागांमध्ये वर्गीकरण

ॲमेझॉनने अनेक युनिट्समध्ये नोकऱ्या कपातीच निर्णय घेऊन २०२४ ची सुरुवात केली आहे. यामध्ये बाय विथ प्राइम, ऑडिओ बुक आणि पॉडकास्ट डिव्हिजन ऑडिबल आणि स्ट्रीमिंग युनिट डविच या कंपन्यांचा सवमेश आहे.

तंत्रज्ञान उद्योगात संकट

या वर्षात आतापर्यंत सुमारे ३२,००० आयटी कामगारांनी टेक उद्योगातील नोकऱ्या गमावल्या आहेत. नोकर कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Salesforce Inc आणि Meta Inc सारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. या वर्षी आतापर्यंत १२२ हून अधिक टेक कंपन्या आणि स्टार्टअप्सनी सुमारे ३२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. जगभरातील स्टार्टअपसह टेक कंपन्यांनी २०२२ आणि २०२३ मध्ये ४,२५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, तर त्याच कालावधीत भारतात ३६,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.

WhatsApp channel

विभाग