Redmi 13 5G: बजेट रेंजमध्ये उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी गूड न्यूज आहे. अॅमेझॉनच्या किक स्टार्टर डीलमध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला रेडमी १३ 5G हा स्मार्टफोन अवघ्या १२ हजार ९९८ रुपयांत उपलब्ध झाला आहे.
भारतात रेडमी १३ 5G दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. रेडमी १३ 5G च्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत १५ हजार ४४९ रुपये आहे. ६ जीबी रॅम असलेल्या व्हेरिएंटवर ग्राहकांना १००० रुपयांचे डिस्काऊंट देत आहे. यामुळे या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९८ रुपये होते.
हा फोन हवाईयन ब्लू, ब्लॅक डायमंड आणि ऑर्किड पिंक कलरमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही जुना फोन एक्स्चेंज करून ११ हजारांपर्यंत डिस्काउंटवर खरेदी करू शकता. पंरतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोनचा ब्रँड आणि कंडिशनवर अवलंबून असेल.
रेडमी १३ ५जी मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनसह ६.७९ इंचाचा फुल-एचडी+ (१,०८०x२,४०० पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. हँडसेट क्वालकॉमचा 4 एनएम ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ४ जेन २ एई प्रोसेसरसह येतो.
फोटो आणि व्हिडिओसाठी रेडमी १३ 5G मध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. व्हिडिओ चॅट आणि सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी १३ 5G मध्ये ५ हजार ०३० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी ३३ वॅट सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
रेडमी कंपनीने नुकताच आपला 5G फोन बाजारात लॉन्च केला असून त्याची सुरूवाती किंमत १३ हजार रुपयांच्या आसपास आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४ जेन २ प्रोसेसर आहे.या फोन चार वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, ज्यात ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज आहे. हा फोन अँड्रॉइड १४ ओएसवर चालतो. फोनमध्ये १८ वॉट चार्जिंग सपोर्टसह ५१६० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. स्वस्त असल्याने फोनमध्ये बेसिक कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.