Amazon Upcoming Sale: स्वातंत्र्य दिनानिमित्त ई- कॉमर्स बेवसाइट अॅमेझॉनने नव्या सेलची घोषणा केली आहे. हा सेल येत्या ६ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होत आहे. तर, ११ ऑगस्ट २०२४ ला संपणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॅमेरा यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ग्राहकांना ८० टक्केपर्यंत सूट मिळण्याची अपेक्षा आहे. टॉप इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वोत्तम डील्स मिळवण्यासाठी या मर्यादित- वेळेच्या ऑफर्स चुकवू नका. सध्या अॅमेझॉनवर सुरू असलेल्या भन्नाट डीलबाबत जाणून घेऊयात.
२०० मेगापिक्सेलकॅमेरा असलेला फोन खरेदी करायचा असेल तर, अॅमेझॉनचा लिमिटेड टाइम डील तुमच्यासाठी आहे. या जबरदस्त डीलमध्ये तुम्ही रेडमी नोट 13 प्रो 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना ३ हजार रुपयांचे फ्लॅट इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. या फोनवर १ हजार ४०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत २६ हजार ५९९ रुपयांनी कमी करू शकता. एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
२० हजार रुपयांच्या रेंजमध्ये नवीन फोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉनच्या खास डीलमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला शानदार फोन विवो वाय ५८ 5G जबरदस्त ऑफर्समध्ये उपलब्ध आहे. हा फोन एक हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. कंपनी फोनवर ९७५ रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन १८ हजार १०० रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
पोको सी ६५ (४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज) हा फोन सेलमध्ये ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतात. फोनवर ३५० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. सेलमध्ये या फोनवर दमदार बँक डिस्काउंटही दिला जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तब्बल ६ हजार ६०० रुपयांची बचत केली जाऊ शकते. फोनचा ईएमआय ३३९ रुपयांपासून सुरू होतो. या फोनमध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा एचडी+ डिस्प्ले पाहायला मिळेल. याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी ८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची बॅटरी ५००० एमएएचची आहे.