Redmi: रेडमी ए४ 5G ठरला अ‍ॅमेझॉनवरून सर्वाधिक खरेदी केला जाणारा फोन, किंमत फक्त ८ हजार ४९८ रुपये!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Redmi: रेडमी ए४ 5G ठरला अ‍ॅमेझॉनवरून सर्वाधिक खरेदी केला जाणारा फोन, किंमत फक्त ८ हजार ४९८ रुपये!

Redmi: रेडमी ए४ 5G ठरला अ‍ॅमेझॉनवरून सर्वाधिक खरेदी केला जाणारा फोन, किंमत फक्त ८ हजार ४९८ रुपये!

Dec 05, 2024 02:17 PM IST

Redmi A4 5G: देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन रेडमी ए४ 5G २७ नोव्हेंबरपासून ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवरून विक्रीसाठी उपलब्ध आहे.

रेडमी ए४ 5G ठरला अ‍ॅमेझॉनवरून सर्वाधिक खरेदी केला जाणारा फोन
रेडमी ए४ 5G ठरला अ‍ॅमेझॉनवरून सर्वाधिक खरेदी केला जाणारा फोन

Amazon Bestselling Smartphones: देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन रेडमी ए४ ५जी नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवरून विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन २७ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता रेडमी एक्सवर पोस्ट करून रेडमी ए४ 5G फोनला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली आहे. म्हणूनच अ‍ॅमेझॉनने याला टॉप बेस्टसेलर स्मार्टफोनच्या श्रेणीत ठेवले आहे.

परवडणाऱ्या रेंजमध्ये चांगला 5G फोन खरेदी करायचा असेल तर, हा फोन चांगला पर्याय आहे. अ‍ॅमेझॉनच्या लिमिटेड टाइम सेलमध्ये रेडमी ए४ 5G कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय ८ हजार ४९८ रुपयांना विकला जात आहे. हा फोन स्पार्कल पर्पल आणि स्टॅरी ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४ एस जेन २ चिपसेट देण्यात आला आहे. हा परवडणारा फोन प्रीमियम हॅलो ग्लास सँडविच डिझाइनसह येतो.

रेडमी ए४ 5G: डिस्प्ले

रेडमी ए४ 5G मध्ये १६४० बाय ७२० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.८८ इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४ एस जेन २ चिपसेट देण्यात आला आहे. हे अँड्रॉइड १४ आधारित हायपरओएस कस्टम स्किनवर चालते.

रेडमी ए४ 5G: कॅमेरा

ऑप्टिक्सच्या बाबतीत, रेडमी ए ४ 5G मध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये सेकंडरी कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी ए४ 5G: बॅटरी

फोनमध्ये ५ हजार १६० एमएएचची बॅटरी आहे, जी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. शाओमी २ वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट आणि ४ वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट जारी करेल.

Whats_app_banner