Redmi 13 C 5G Price and Specifications: चीनी टेक कंपनी शाओमी अनेक बजेट उपकरणांचा पोर्टफोलिओ ऑफर करत आहे. शाओमीचे अनेक 5G स्मार्टफोन आता त्यांच्या मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी किमतीत उपलब्ध आहेत. रेडमी १३ सी 5G स्मार्टफोन १४ हजारांत लॉन्च केला गेला. मात्र, अॅमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये हा स्मार्टफोन १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो.
कंपनीने रेडमी १३ सी 5G स्मार्टफोनला १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला होता.या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह मोठा डिस्प्ले मिळत आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर १००० रुपयांचे डिस्काऊंट कूपन उपलब्ध आहे. रेडमी १३ सी 5G स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली. परंतु, अॅमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट समर सेलमध्ये हा स्मार्टफोन २५ टक्के सूटसह १० हजार ४९९ रुपयांना सूचीबद्ध झाला आहे. अॅमेझॉन ग्रेट सेलमध्ये या स्मार्टफोनवर १००० रुपयांचे कूपन देखील दिले जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन ९ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकतात.
या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. एक्स्चेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना ९ हजार ९०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, एक्स्चेंज ऑफरची किंमत जुन्या स्मार्टफोनचे मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असेल. हा स्मार्टफोन फोन स्टारट्रेल सिल्व्हर, स्टारट्रेल ग्रीन आणि स्टारलाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
रेडमी १३ सी 5G स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास ३ संरक्षणासह ९०Hz रिफ्रेश रेटसह ६.७४ इंचचा मोठा डिस्प्ले मिळत आहे. हे MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरसह येते. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. ज्यात प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. MIUI 14 सह येणाऱ्या रेडमी १३ सी 5G मध्ये ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली, जी १८ वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.
संबंधित बातम्या