amazon great republic day sale : अॅमेझॉनच्या प्राइम यूजर्ससाठी शनिवार, १३ जानेवारी रोजी दुपारपासून अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू होणार आहे. या सेलचा भाग म्हणून कंपनीनं आधीच विशलिस्ट पेज लाँच केलं आहे. गेट सेल रेडी सेक्शन तयार केला आहे. यासोबतच आता अॅमेझॉनवरनं एक सिक्रेट सेल सेक्शन तयार केला आहे. इथं अवघ्या १ रुपयात शॉपिंग करता येणार आहे.
हा सिक्रेट सेल सेक्शन म्हणजे सॅम्पल मनिया सेक्शन आहे. या सेक्शनचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे. खरेदी करण्याआधी संबंधित वस्तूचे सॅम्पल वापरून पाहण्याची सुविधा सॅम्पल मॅनिया सेक्शनच्या माध्यमातून युजर्सना मिळणार आहे. एरवी अॅमेझॉनकडून हे सॅम्पल ९९ रुपयांना विकले जातात. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या सेलच्या निमित्तानं खरेदीदारांना हे सॅम्पल फक्त १ रुपयांत मिळणार आहेत.
सेलच्या काळात अॅमेझॉनच्या साइटवर दररोज दुपारी ३ वाजता नवीन सॅम्पल पाहायला मिळतील. इथं तुम्हाला अवघ्या १ रुपयात उत्पादनांचे नमुने खरेदी करण्याची संधी मिळेल.
अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरील सॅम्पल मनिया सेक्शनमध्ये कॉस्मेटिक आणि आरोग्यवर्धक पदार्थांच्या सॅम्पलचा समावेश आहे.
१३ जानेवारी रोजी अॅमेझॉनचा ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू झाल्यावर विक्री पानावरील (Sale Page) सॅम्पल मनिया सेक्शनला भेट द्या.
खरेदी करण्याआधी जी वस्तू तुम्हाला वापरून पाहायची आहे, ती तुमच्या कार्टमध्ये जोडा.
कार्ट पेजवर ‘कलेक्ट वन सॅम्पल’ हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
हे केल्यानंतर सॅम्पल तुमच्या घरी पोहोचवलं जाईल.
ही ऑफर आता सुरू नाही. १ रुपयांत सॅम्पल ही ऑफर हा रिपब्लिक डे सेलचा भाग आहे.