Amazon Sale: इ- कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day Sale) सुरु झाला आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळत आहे. दरम्यान, या सेलमध्ये ग्राहकांना वनप्लस १० आर 5G (OnePlus 10R 5G) हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या फोनच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर्स आणि कूपर डिस्काऊंट देखील मिळत आहे. हा फोन ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन रंगात बाजारात उपलब्ध आहे. फोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या खरेदीवर ग्राहकांना पैसे वाचवता येणार आहेत.
वनप्लस १० आर 5G स्मार्टफोनची (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) किंमत ३८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र, अमेझॉनवर हा स्मार्टफोन ३४ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ४ हजारांचे प्लॅट डिस्काऊंट दिले जात आहे. या फोनवर कूपन ऑफर्स देखील मिळत आहे, ज्याद्वारे ग्राहकांना तब्बल ७ हजारांची बचत करता येणार आहे.
याशिवाय, बँक ऑफर अतंर्गत ग्राहकांना ३ हजार २५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या सगळ्या ऑफर्सचा लाभ घेतल्यास या फोनची किंमत २४ हजार ७४९ रुपये होईल. म्हणजेच ग्राहकांना हा फोन १४ हजाराने स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. अमेझॉनवर सुरु असलेला ग्रेट रिपब्लिक सेल काही दिवसांसाठीच असेल. मात्र, त्यानंतर ग्राहकांना कोणत्याही वस्तूवर सूट दिली जाणार नाही.
वनप्लस १० आर 5G मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो १२० हर्ट्स रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेमध्ये हायपर टच मोड, रीडींग मोड, नाइट मोड, आय कंफर्ट आणि ऑटो ब्राइटनेससारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन अँड्राइड १२ बेस ऑक्सिजन ओएसवर काम करतो. वनप्लस १० आर 5G हा ८ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. सेफ्टीसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळत आहे. फोनच्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.
संबंधित बातम्या