
अॅमेझॉनवर सुरू असलेला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दिवाळी सेल उद्या म्हणजेच २९ ऑक्टोबर 2024 ला संपणार आहे. दरम्यान, वनप्लस, सॅमसंग किंवा अॅपलचे महागडे फोन मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची शेवटची संधी आहे. या तिन्ही फोनच्या खरेदीवर ग्राहक सात हजारांपर्यंतचे डिस्काउंट मिळत आहे. विशेष म्हणजे, सेलमध्ये तुम्ही हे फोन कॅशबॅक आणि बंपर एक्स्चेंज डील्समध्येही ऑर्डर करू शकतात. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपला जुना फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
वनप्लस १२ च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ६१ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये ग्राहक हा फोन सात हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. फोनवर ३ हजार १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत ५३ हजार २०० रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. फोनमध्ये 2K रिझोल्यूशनसह १२० हर्ट्झ प्रोएक्सडीआर डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळत आहे. फोनची बॅटरी ५ हजार ४०० एमएएचची आहे, जी १०० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा 5G एआय (१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज) फोनची किंमत ७४ हजार ९९९ रुपये आहे. फोनवर १ हजार रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे. सेलमध्ये फोनवर ३ हजार ७५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत ६० हजार ६०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेटवर काम करतो.
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या दिवाळी स्पेशल डीलमध्ये आयफोन १३ (१२८ जीबी स्टोरेज) रेड व्हेरियंट ४२ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत १ हजार रुपयांनी कमी करू शकता. फोनवर २ हजार १५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत ४० हजार ४५० रुपयांपर्यंत कमी करू शकता. आयफोन १३ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ कॅमेरा दिला आहे. हा फोन ए१५ बायोनिक चिपसेटवर काम करतो.
संबंधित बातम्या
