Samsung Galaxy S24 5G Price: दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंग स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठ्या मार्केट शेअरसह टॉप लिस्टचा भाग आहे. सॅमसंगचे फ्लॅगशिप डिव्हाइस डिस्प्ले आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत शक्तिशाली आहेत. आता अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलदरम्यान कंपनीचा सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप डिव्हाइस गॅलेक्सी एस २४ 5G ग्राहकांना मूळ किंमतीपेक्षा किंमतीपेक्षा २५ हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
गॅलेक्सी एस २४ 5G हा एआयसह आर्टिफिशियल इंटेलिजन्स-आधारित फीचर्ससह येतो. यात बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सिस्टिम देण्यात आली. ६.२ इंचाचा मोठा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अँड्रॉइड १४ सोबत येणाऱ्या या डिव्हाइसला पुढील सात वर्षे मोठे अपडेट्स मिळत राहतील आणि सॉफ्टवेअर फीचर्सच्या बाबतीत ते कालबाह्य होणार नाही.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ 5G (८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज) हा फोन वर्षाच्या सुरुवातीला ७९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. मात्र, अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस २४ 5G चा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंट ५५ हजार ७०० रुपयांना लिस्ट झाला आहे. याशिवाय, निवडक बँक कार्डवरून पेमेंट केल्यास १००० रुपयांपर्यंतची सूट मिळते. म्हणजेच ग्राहकांना लॉन्च किमतीच्या तुलनेत जवळपास २५ हजारांनी स्वस्त मिळत आहे.
या फोनवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. एक्स्चेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना ४८ हजार ८५० रुपयपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट जूना फोनचा ब्रँड आणि कंडीशनवर अवलंबून असेल. हा फोन ओनिक्स ब्लॅक, मार्बल ग्रे, कोबाल्ट व्हायोलेट आणि अंबर यलो या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंगफ्लॅगशिप फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १०+ आणि २६०० नाइट्सची पीक ब्राइटनेस सह ६.२ इंचाचा डायनॅमिक एलटीपीओ एमोलेड २ एक्स डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन मिळते आणि आयपी ६८ डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्ससोबत येतो. यात अँड्रॉइड १४ वर आधारित वनयूआय सॉफ्टवेअर असून स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर आहे.
गॅलेक्सी एस २४ 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात बॅक पॅनेलवर ५० एमपी प्रायमरी, १० एमपी टेलिफोटो आणि १२ एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. यात ४००० एमएएच बॅटरी २५ वॅट वायर्ड, १५ वॅट वायरलेस आणि ४.५ वॅट रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट देते.