Samsung Galaxy M15: 6000 एमएएचची बॅटरी, अवघ्या १० हजार २९९ रुपयांत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एम १५!-amazon great indian festival sale samsung galaxy m15 5g ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy M15: 6000 एमएएचची बॅटरी, अवघ्या १० हजार २९९ रुपयांत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एम १५!

Samsung Galaxy M15: 6000 एमएएचची बॅटरी, अवघ्या १० हजार २९९ रुपयांत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एम १५!

Sep 24, 2024 07:55 PM IST

Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम १५ च्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम १५ च्या खरेदीवर मोठी सूट
सॅमसंग गॅलेक्सी एम १५ च्या खरेदीवर मोठी सूट

Amazon Great Indian Festival Sale: बजेट सेगमेंटमधील सॅमसंगच्या स्मार्टफोनला मोठी पसंती दिली जाते. दिवाळीपूर्वी स्वस्तात चांगला फोन घ्यायचा असेल तर सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G ही तुमची पसंती ठरू शकते. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हा फोन स्वस्तात विकला जाणार आहे. अ‍ॅमेझॉनकडून सवलतीची किंमत जाहीर करण्यात आली. मोठी बॅटरी आणि उत्तम कॅमेरा असलेला हा फोन खरेदी करायचा असेल तर, ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असेल.

अ‍ॅमेझॉनने जारी केलेल्या पोस्टनुसार अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम १५ ५ जी १० हजार २९९ रुपयांना मिळणार आहे. हा फोन १३ हजार ४९९ रुपयांच्या बेस प्राइसमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनवर तुम्हाला ३ हजार २०० रुपयांची सूट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सॅमसंगचा हा फोन तुम्ही ब्लू टोपाझ, स्टोन ग्रे, सेलेस्टिकल ब्लू कलरमध्ये खरेदी करू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G: डिस्प्ले

सॅमसंगच्या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल-एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह वॉटरड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+ चिपसेट देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G: कॅमेरा आणि बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा शूटर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G मध्ये ४५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएच बॅटरी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस 5G भारतात लॉन्च

सॅमसंगने गॅलेक्सी एम सीरिजचा आणखी एक स्मार्टफोन २३ सप्टेंबर २०२४ रोजी लॉन्च केला होता. सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १ प्रोसेसरसह मिड-रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये घोषित करण्यात आला होता. हा स्मार्टफोन आकर्षक कलर व्हेरिएंटसह नवीन फ्यूजन डिझाइनसह येतो. सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस 5G येत्या २६ सप्टेंबर २०२४ पासून अधिकृत वेबसाईट, अॅमेझॉन आणि किरकोळ स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल

Whats_app_banner
विभाग