Amazon Great Indian Festival Sale: सॅमसंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात नुकताच लाँच झालेला सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस हा ब्रँडचा लेटेस्ट 5G फोन अॅमेझॉनवर दमदार डिस्काउंटसह उपलब्ध आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हा फोन २००० रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. म्हणजेच आता हा फोन कोणत्याही बँक ऑफरशिवाय १७ हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येणार आहे.
गॅलेक्सी एम ५५ एस ५ जी फोन दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि दोन्हीमध्ये स्टँडर्ड ८ जीबी रॅम आहे. गॅलेक्सी एम ५५ एसच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. कोरल ग्रीन आणि थंडर ब्लॅक कलर या दोन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
अॅमेझॉन सेलमध्ये दोन्ही मॉडेल्स २,००० रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. कूपन डिस्काउंट घेतल्यास ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १७ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २० हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येईल. ग्राहकांना हा फोन दरमहा ९७० रुपयांपासून सुरू होणाऱ्या ईएमआयवर देखील खरेदी करता येऊ शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस 5G मध्ये ड्युअल टोन बॅक डिझाइनसह स्लिम प्रोफाइल आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस सॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १००० निट्सची ब्राइटनेस लेव्हल ऑफर करतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसर, ८ जीबी व्हर्च्युअल रॅम सह ८ जीबी स्टँडर्ड रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस ५ जी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ओआयएससह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ड्युअल रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो म्हणजेच युजर्स एकाच वेळी फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेऱ्यातून व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.
फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ४५ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी आहे. यात सॅमसंगचा नॉक्स वॉल्ट सिक्युरिटी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनची जाडी ७.८ मिमी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, फोनमध्ये चार प्रमुख ओएस अपग्रेड आणि ५ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जातील. फोनच्या बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही.