iPhone 13: अॅमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भरघोस डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सेलअंतर्गत अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये आयफोन १३ खरेदीवर ग्राहकांना ४० हजारापर्यंत एक्स्चेंच ऑफर मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, एक्स्चेंज ऑफर ग्राहकांचा फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
अॅमेझॉनवर आयफोन १२ (१२८ जीबी, स्टारलाइट) ४२ हजार ९९९ रुपयांत लीस्ट करण्यात आला. तसेच या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ३९ हजार ६५० रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. ग्राहकांना एक्स्चेंज ऑफरचा पूर्ण फायदा घेतल्यास त्यांना हा फोन अवघ्या ३ हजार ३४९ रुपयांत मिळेल. याशिवाय, आयफोन १३ च्या खरेदीवर ग्राहकांना १ हजार २५० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि २ हजार १५० रुपयांचे कॅशबॅक देखील मिळत आहे.
आयफोन १३ मध्ये ग्राहकाना ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा वाइड आणि अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. याचा सेल्फी कॅमेराही १२ मेगापिक्सलचा आहे. आयफोन १३ मध्ये प्रोसेसर म्हणून कंपनी ए १५ बायोनिक चिपसेट ऑफर करत आहे.
वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5G (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) सेलमध्ये १९ हजार ९९८ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हा फोन एक हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनवर २ हजार रुपयांपर्यंत कूपन डिस्काउंट देखील दिला जात आहे. हा फोन ९९९ रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी करण्याची संधी आहे. या फोनसोबत वनप्लस बुलेट्स इयरफोन्स देखील फ्री मिळणार आहेत. एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकांना १८ हजार ८०० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटचा डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५५०० एमएएच ची आहे, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सॅमसंग गॅलेक्सी एम१५ 5G च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन सेलमध्ये १० हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. कंपनी फोनवर २५० रुपयांचे कूपन आणि ७५० रुपयांचा बँक डिस्काउंट देत आहे. या दोन्ही ऑफर्ससह फोन ९ हजार ९९९ रुपयांमध्ये ग्राहकांचा होऊ शकतो. बँक ऑफरसाठी तुम्हाला एसबीआयच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करावे लागेल. सेलमध्ये ग्राहक हा फोन ५५० रुपयांपर्यंत कॅशबॅकसह खरेदी करू शकता. हा फोन आकर्षक एक्स्चेंज डील्समध्येही खरेदी करता येणार आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ६००० एमएएचची बॅटरी मिळेल.