Amazon Sale: अ‍ॅमेझॉनचा बंपर सेल! नुकताच लॉन्च झालेल्या आयटेल कलर प्रोच्या खरेदीवर दमदार ऑफर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon Sale: अ‍ॅमेझॉनचा बंपर सेल! नुकताच लॉन्च झालेल्या आयटेल कलर प्रोच्या खरेदीवर दमदार ऑफर

Amazon Sale: अ‍ॅमेझॉनचा बंपर सेल! नुकताच लॉन्च झालेल्या आयटेल कलर प्रोच्या खरेदीवर दमदार ऑफर

Oct 18, 2024 02:02 PM IST

Smartphones Under 9000: अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये नुकताच लॉन्च झालेल्या आयटेल कलर प्रो 5G स्मार्टफोन अवघ्या ९ हजारांत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आयटेल कलर प्रो 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी
आयटेल कलर प्रो 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Amazon great indian festival Sale: १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार परफॉर्मन्स फोन घ्यायचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये तुमच्यासाठी एक भन्नाट डील आहे. या डीलमध्ये ग्राहक १२ जीबी रॅम (६ जीबी रिअल + ६ जीबी मेमरी फ्यूजनसह) आयटेल कलर प्रो 5G स्वस्तात खरेदी करू शकतात. अ‍ॅमेझॉनवर या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. या सेलमध्ये आयटेल कलर प्रो 5G च्या खरेदीवर ९९९.९० रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटनंतर जवळपास 9 हजार रुपयांमध्ये हा फोन होऊ शकतो.

या फोनवर जवळपास ५०० रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे. ग्राहक एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत आणखी कमी करू शकतात. लक्षात ठेवा की एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

आयटेल कलरप्रो 5G: डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस आयडी ऑथेंटिकेशनचा पर्याय देण्यात आला आहे.

आयटेल कलर प्रो 5G: कॅमेरा

या फोनमध्ये ५० एमपी एआय कॅमेरा मुख्य कॅमेरा मिळत आहे. सेल्फी किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे.

आयटेल कलर प्रो 5G: बॅटरी

कलरप्रो 5 जी मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६०८० प्रोसेसर आहे आणि मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी सपोर्ट करते आणि 8 जीबी रॅम ऑफर करते. या फोनच्या ५००० एमएएच बॅटरीला १८ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

आयटेल कलर प्रो 5G: किंमत

४ जीबी इंस्टॉल आणि ४ जीबी व्हर्च्युअल रॅम सह कलरप्रो 5G ७ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. कारण निवडक रिटेल आउटलेट्सद्वारे यावर १००० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हा फोन लॅव्हेंडर फॅन्टसी आणि रिव्हर ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.

आयटेल कंपनीचा इयरबड्स भारतात लॉन्च

आयटेल इंडियाने आपला नवीन टीडब्ल्यूएस इयरबड्स भारतात लॉन्च केला आहे. कंपनीचे नवे इयरबड्स उत्कृष्ट ३६० डिग्री बेस टेक्नॉलॉजीसह येतात. त्यांचे ड्युअल टोन डिझाइन खूप प्रीमियम आहे. या बड्सची बॅटरी लाइफ ३० तासांपर्यंत असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची किंमत फक्त 899 रुपये आहे.

 

Whats_app_banner