Amazon Great Indian Festival Sale: इ- कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने आपल्या वर्षातील सर्वात मोठा सेल अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची सुरूवात केली आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बंपर डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, मोठ्या स्क्रीनचा टीव्ही घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्राहक एक लाखांचा स्मार्ट टीव्ही अवघ्या ३३ हजारांत खरेदी करू शकतात.
अॅमेझॉनच्या सेलमध्ये एका स्मार्ट टीव्हीवर ६९ टक्क्यांपर्यत सूट दिली जात आहे. याशिवाय, ग्राहकांना बँक ऑफर्स देखील मिळत आहे. यामुळे ग्राहक हा स्मार्ट टीव्ही अवघ्या ३२ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकतात. अॅमेझॉन सेलमध्ये उपलब्ध असलेल्या अशा सर्वोत्तम डील्सबाबत जाणून घेऊयात.
सोनी कंपनीच्या स्मार्ट टीव्हीला बाजारात खूप मागणी आहे. सोनी ब्राविया २ 4K अल्ट्रा HD स्मार्ट टीव्ही 4K अल्ट्रा एचडी रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये २० वॅट्सचा आउटपुट आवाज आहे, जो खूप मोठा आहे. या टीव्हीची मूळ किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा टीव्ही ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसह फक्त ५९ हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, ग्राहकांना ४ हजार रुपयांची बँक सूट आणि २ हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होते.
सॅमसंग डी सीरीज ब्राइटर क्रिस्टल 4K डायनॅमिक अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्हीवर अॅमेझॉन सेलमध्ये बंपर डिस्काऊंटही मिळत आहे. कंपनीने हा टीव्ही ७८ हजार ९०० रुपयांत लॉन्च केला होता. पण, अॅमेझॉन सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही फक्त ४७ हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, ग्राहकाला ४००० रुपयांची बँक सूट आणि २ हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. त्यामुळे स्मार्ट टीव्हीची अंतिम किंमत ४० हजार रुपये झाली.
टीसीएल १३९ सेमी (५५ इंच) 4K अल्ट्रा HD स्मार्ट क्यूएलईडी गूगल टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. अॅमेझॉन सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही अवघ्या ३६ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकता, ज्याची मूळ किंमत १ लाख २० हजार ९९० रुपये आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना ४००० रुपयांचे बँक डिस्काऊंटही मिळत आहे. ज्यामुळे या टीव्हीची किंमत ३२ हजार ९९० रुपये होते. एक्स्चेंज ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर हा स्मार्टटीव्ही ३० हजार रुपयांपर्यंत खरेदी केला जाऊ शकतो.