Amazon Diwali Sale 2024: अॅमेझॉनवर सुरू असलेला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दिवाळी सेल आज (२९ ऑक्टोबर २०२४) संपणार आहे. सेलच्या शेवटच्या दिवशी ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या दिवाळीत नवा फोन किंवा नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
अॅमेझॉन सेलमध्ये ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहे. दिवाळी स्पेशल सेलमध्ये या फोन आणि टीव्हीवर बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक दिला जात आहे. याशिवाय, काही अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एक्स्चेंज ऑफरमध्ये उपलब्ध आहेत. परंतु, एक्स्चेंज ऑफर जुना ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ ची किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसह ६ हजार ४९९ रुपये आहे. दिवाळी स्पेशल सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर ३२५ रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन ६ हजार १५० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. हा फोन तुम्ही आकर्षक ईएमआयवरही खरेदी करू शकतात. सॅमसंगच्या या एंट्री लेव्हल फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी कंपनी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देत आहे. फोनची बॅटरी ५००० एमएएचची आहे, जी २५ वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.
रियलमी नार्झो एन ६१ ची किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसह ७ हजार ४९८ रुपये आहे. दिवाळी स्पेशल सेलच्या शेवटच्या दिवशी तुम्ही हा फोन ७५० रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनवर ३७५ रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये याची किंमत ७ हजार १०० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. हा फोन ३६४ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयसह खरेदी करू शकतात. या फोनमध्ये ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळत आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
वेस्टिंगहाऊस ३२ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दिवाळी सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही ३७५ रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी करू शकतात. तसेच हा स्मार्ट टीव्ही ३६४ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर उपलब्ध असते. या स्मार्ट टीव्हीमध्ये वाइड व्ह्यूइंग अँगलसह एक शानदार डिस्प्ले मिळत आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्झ आहे. दमदार साउंडसाठी ग्राहकांना टीव्हीमध्ये २० वॅटचे साउंड आउटपुट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात दोन एचडीएमआय आणि २ यूएसबी पोर्ट आहेत.
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या दिवाळी स्पेशल डीलमध्ये कोडॅक ८० सेमी (३२ इंच) स्पेशल एडिशन सीरिज एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही ३२ एसई ५००१ बीएल (ब्लॅकहा टीव्ही ७ हजार ९९९ रुपयांना खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये या स्मार्ट टीव्हीची किंमत १० टक्क्यांनी कमी केली जाऊ शकते. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना ४०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. या टीव्हीमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेज देत आहे. टीव्हीमध्ये देण्यात येणारा डिस्प्ले ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात सराउंड साऊंडसह ३० वॅटचे साउंड आउटपुट आहे.
संबंधित बातम्या