Amazon: ६ जीबी रॅम, सुपरफास्ट चार्जिंग; अ‍ॅमझॉन सेलमध्ये अवघ्या १२,४९९ रुपयांत खरेदी करा ‘हा’ फोन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon: ६ जीबी रॅम, सुपरफास्ट चार्जिंग; अ‍ॅमझॉन सेलमध्ये अवघ्या १२,४९९ रुपयांत खरेदी करा ‘हा’ फोन

Amazon: ६ जीबी रॅम, सुपरफास्ट चार्जिंग; अ‍ॅमझॉन सेलमध्ये अवघ्या १२,४९९ रुपयांत खरेदी करा ‘हा’ फोन

Oct 20, 2024 12:08 AM IST

Amazon Sale: अ‍ॅमझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या दिवाळी डीलमध्ये ६८ वॅट फास्ट चार्जिंग असलेल्या टेक्नो पोवा 5 प्रो 5G अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात.

अ‍ॅमझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल
अ‍ॅमझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल

Amazon Great Indian Festival 2024: बजेट सेगमेंटमधील बेस्ट फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी एक दमदार डील आहे. अ‍ॅमझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दिवाळी डीलमध्ये ६८ वॅट फास्ट चार्जिंगसह येणारा टेक्नो पोवा 5 प्रो 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर १५०० रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे. कूपन डिस्काउंटनंतर हा फोन १२ हजार ४९९ रुपयांचा होईल. बँक ऑफरमध्ये ग्राहक या फोनची किंमत आणखी एक हजार रुपयांनी कमी करू शकता. फोनवर ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे.

एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन १३,२५० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर एक्सटेंडेड रॅम फीचरसोबत तुम्हाला १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळेल. 

टेक्नो पोवा 5 प्रो 5G: डिस्प्ले

कंपनी या फोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी+ एलसीडी पॅनेल देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

टेक्नो पोवा 5 प्रो 5G: डिस्प्ले स्टोरेज

हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 चिपसेट देत आहे. एक्सटेंडेड रॅम फीचरच्या मदतीने फोनची एकूण रॅम १६ जीबीपर्यंत वाढते.

टेक्नो पोवा 5 प्रो 5G: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. 

टेक्नो पोवा 5 प्रो 5G: बॅटरी

या फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ६८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

अ‍ॅमेझॉन सेल: स्मार्ट गॅजेट्सवर भरघोस सूट

'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'मध्ये अॅमेझॉन आपल्या स्मार्ट गॅजेट्सवर भरघोस सूट देत आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये ग्राहकांना लेटेस्ट फीचरपॅक्ड स्मार्ट गॅजेट्सवर ७१ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. टीडब्ल्यूएस इयरबड्स, नेकबँड, वायर्ड इयरफोन्स, स्मार्टवॉच, चार्जर, पॉवरबँकपर्यंत सर्व गोष्टींवर मोठी सूट देत आहे.

Whats_app_banner