amazon sale : सवलती आणि ऑफरचा पाऊस पडणार! अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल कधीपासून कधीपर्यंत चालणार?-amazon great indian festival 2024 live from 27 sept company have big plan check details ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  amazon sale : सवलती आणि ऑफरचा पाऊस पडणार! अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल कधीपासून कधीपर्यंत चालणार?

amazon sale : सवलती आणि ऑफरचा पाऊस पडणार! अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल कधीपासून कधीपर्यंत चालणार?

HT Marathi Desk HT Marathi
Sep 24, 2024 04:25 PM IST

सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या विविध प्रकारची विक्री आणि ऑफर्स लाँच करत आहेत.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2024
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2024

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2024: सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या विविध प्रकारची विक्री आणि ऑफर्स लाँच करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू केला आहे. या फेस्टिव्हल सेलमध्ये आपल्या ग्राहकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कंपनीने खास तयारी केली आहे. अॅमेझॉन इंडियाचे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक रणजित बाबू यांनी लाइव्ह हिंदुस्थानशी बोलताना आपल्या तयारीची माहिती दिली आहे. जाणून घेऊया सविस्तर…

२७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, फ्रिजसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोठ्या सवलतीत खरेदी करता येणार आहेत. या सेलमध्ये सामान्य दिवसांपेक्षा खूपच स्वस्त दरात प्रॉडक्ट्स मिळणार आहेत. केवळ ब्रँडच नव्हे तर विक्रेतेही ग्राहकांना सवलतीच्या दरात उत्पादने देत आहेत. सेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त एक्सचेंज ऑफर्सही मिळतात. म्हणजेच जुने प्रॉडक्ट विकून तुम्ही डिस्काउंटसह नवीन वस्तू खरेदी करू शकाल.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ग्राहकांना प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी लगेच पैशांची गरज भासणार नाही. नो-कॉस्ट ईएमआय आणि अॅमेझॉन पे लेटर सुविधेद्वारे तुम्ही वस्तू खरेदी करू शकाल. अॅमेझॉन पे लेटर सेवेत ग्राहकाला क्रेडिट प्रोफाइलनुसार पैसे खर्च करावे लागतात. हे पैसे काही दिवसांनी दिले जातात. या सेवेसाठी ग्राहकांना काही महत्त्वाची माहिती प्रविष्ट करावी लागते.

जर तुम्ही अॅमेझॉन प्राईम युजर असाल तर तुम्हाला 24 तास आधी अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या माध्यमातून शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे. प्राइम युजर्संना काही एक्स्ट्रा डिस्काऊंट ऑफर्सही मिळतील. बुकिंगच्या दिवसापासून ४८ तासांत हे उत्पादन प्राईम ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाईल.

यावेळी अॅमेझॉनचे लक्ष डिलिव्हरी सेगमेंटवर आहे. सेलमध्ये बुक केलेले उत्पादन लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. देशातील ज्या ग्रामीण किंवा शहरी भागात आतापर्यंत समस्या आल्या आहेत, अशा भागातही कंपनी डिलिव्हरी करणार आहे. मशीन लर्निंगचा वापर करून गावे आणि छोट्या शहरांची गरज समजून घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ग्राहकांना वेळ आणि तारखेनुसार डिलिव्हरी सुविधेचा लाभ घेता येणार आहे. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव, फोटो आदींची माहितीही आता ग्राहकांना मिळणार आहे.

Whats_app_banner