Massive Discount On Realme GT 6T Discount: रियलमीने यावर्षी मे महिन्यात रियलमी जीटी 6 टी स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता अॅमेझॉन फेस्टिव्ह सेलमध्ये हा फोन ५००० रुपयांच्या डिस्काउंटवर विकला जात आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन ६००० निट्स ब्राइटनेस असलेला जगातील सर्वात चमकदार डिस्प्ले स्मार्टफोन आहे. यात दमदार डिस्प्लेसह दमदार प्रोसेसर देखील देण्यात आला आहे.
अॅमेझॉन रियलमी जीटी ६ टी च्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनवर ४००० रुपयांचा कूपन डिस्काउंट देत आहे. ज्यामुळे फोनची किंमत थेट ४००० रुपयांनी कमी होते. तसेच कोणत्याही बँकेच्या कार्डने फोन खरेदी केल्यास १००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. ज्यामुळे हा फोन ५००० रुपयांमध्ये स्वस्तात खरेदी करता येणार आहे. हा फोन ३० हजार ९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला. याच किंमतीत अॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. पण ५००० रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन २५ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. जुन्या फोन एक्स्चेंजवर खरेदी केल्यास २० हजार रुपयांपर्यंत च्या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. परंतु ही सवलत पूर्णपणे आपल्या जुन्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून आहे.
फोनमध्ये ६.७८ इंचाचा एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित रियलमी यूआय ५ वर काम करतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ७+ जेन ३ चिपसह येतो. कंपनीचा दावा आहे की, हा भारतातील पहिला फोन आहे, जो या प्रोसेसरसह येतो. फोन जास्त गरम होऊ नये म्हणून यात १० हजार १४ चौरस मिमी थ्रीडी व्हेपर कूलिंग चेंबर देखील देण्यात आले आहे.
रियलमी जीटी ६ टी मध्ये दमदार कॅमेरा सेटअप आहे, हा फोन ओआयएस सपोर्टसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सोनी एलवायटी -600 लेन्ससह ५० मेगापिक्सल मेन रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलअल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरासह येतो. सेल्फीसाठी फोनमध्ये सोनी आयएमएक्स६१५ सेन्सरसह ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनवरून 4K व्हिडिओ शूट करू शकता.
यासोबतच रियलमी फोनमध्ये १२० वॉट सुपरव्हीओसी चार्जिंग सपोर्टसह ५५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहे. दमदार आवाजासाठी फोनमध्ये स्टिरिओ स्पीकरही देण्यात आले आहेत.