मराठी बातम्या  /  बिझनेस  /  iPhone Offers: आयफोन १५ प्रोच्या खरेदीवर १० हजारांची सूट; आयफोन १५ प्रो मॅक्स १४ हजारांनी स्वस्त

iPhone Offers: आयफोन १५ प्रोच्या खरेदीवर १० हजारांची सूट; आयफोन १५ प्रो मॅक्स १४ हजारांनी स्वस्त

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 12, 2024 12:15 PM IST

Amazon Fab Phones Fest sale: अमेझॉनवर आयफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे.

Iphone
Iphone

iPhone 15 Pro and iPhone 15 Pro Max: संपूर्ण देशात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन वीक निमित्ताने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉनकडून आयफोनच्या खरेदीवर मोठे डिस्काऊंट मिळत आहे. ग्राहकांना आयफोन १५ प्रोच्या खरेदीवर १४ हजारांची बचत करता येणार आहे. निवडक बँक कार्ड्सने पेमेंट करणाऱ्यांना अतिरिक्त सूट मिळत आहे.

आयफोन १५ प्रो मॉडेल्स हे बाजारातील सर्वात शक्तिशाली मोबाइल पैकी आहे. या मॉडेल्समध्ये उत्कृष्ट फीचर्सचा समावेश आहे. यामुळे इतर फोन आयफोन १५ प्रोशी स्पर्धा करू शकत नाही. अमेझॉनवर सुरु असलेल्या फेब फोन्स डे सेल मध्ये या मॉडेलच्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे.

भारतीय बाजारात आयफोन १५ प्रोची मूळ किंमत १ लाख ३४ हजार ९०० रुपये आहे. मात्र, अमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये हा आयफोन १५ प्रो अवघ्या १ लाख २७ हजार ९९० रुपयांत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एचडीएफसी कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ३ हजारांची त्वरीत सूट उपलब्ध आहे. अशा प्रकारे ग्राहकांना एकूण १० हजारांची बचत करता येणार आहे.

टायटॅनियम बिल्डसह आयफोनच्या दोन्ही मॉडेल्सवर एक्स्चेंज ऑफरचा लाभही दिला जात आहे. परंतु, ग्राहक बँक किंवा एक्सचेंज ऑफरपैकी एकाचा लाभ घेऊ शकतात. या मॉडेल्समध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळत आहे. व्यतिरिक्त ए १७ प्रोसह जबरदस्त कामगिरीचा लाभ मिळतो. यात ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा मिळतो.

WhatsApp channel

विभाग